मुंबईराज्यात लाखो मुले अंगणवाडीमध्ये अनौपचारिक शिक्षण आणि पोषण आहार घेतात. त्यासोबत स्तनदा माता, गरोदर महिला यांनादेखील अंगणवाडीकडून विविध सेवा दिल्या जातात. अंगणवाडी कर्मचारी हे कुठल्याही तात्पुरता योजनेचा भाग नाही. तर हे शासनाने कायद्याने निर्माण केलेली पदे आहेत. त्यामुळे या सर्व लाखो कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी. रिक्त पदे त्वरित भरावी, या मागणीसाठी राज्यभर अंगणवाडी संघटनेच्या वतीने मोर्चे सुरू (Anganwadi workers march on 20 September against demand filled vacant posts immediately ) आहे. याचा एक भाग म्हणून 20 सप्टेंबर 2022 रोजी आझाद मैनावर लाखोंचा मोर्चा धडकणार ( Anganwadi workers march on 20 September ) आहे.
राज्यात हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त -महाराष्ट्र राज्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजना अंतर्गत 97,475 अंगणवाडी सेविका 97475 मदतनीस व 13 011 मिनी अंगणवाडी सेविका पदे निर्माण केली आहे. राज्यामध्ये आजही ग्रामीण आदिवासी व शहरी भागात 19 हजाराचे 845 पदे रिक्त असल्याने लाभार्थ्यांना या योजनेचे फायदे मिळत नाही. त्यामुळे बालमृत्यू आणि कुपोषण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं त्यांचं म्हणणं ( march demand vacant posts filled immediately ) आहे.