महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 12, 2022, 1:23 PM IST

ETV Bharat / state

Announcement Of Minister : अंगणवाड्या सुरू होणार, बालकांना पुन्हा मिळणार गरम ताजा आहार

कोविड काळात गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या अंगणवाड्या लवकरच सुरू होणार (Anganwadi will start) असून बालकांना गरम ताजा आहार पुन्हा मिळणार ( children will get hot fresh food again) आहे, अशी ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर (Minister Adv Yashomati Thakur) यांनी आज विधान परिषदेत दिली आहे.

मुंबई:विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान आमदार रणजित पाटील यांनी अंगणवाडीतील बालकांना गरम ताजा आहार केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अँड. यशोमती ठाकूर (Minister Adv Yashomati Thakur) यांनी सांगितले की, कोविड काळात अंगणवाड्या सुरू ठेवणे आणि बालकांना गरम ताजा आहार देणे शक्य नव्हते, त्यामुळे सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन गरम ताज्या आहाराच्या ऐवजी बालकांना त्यांच्या घरापर्यंत पोषण आहार मिळेल याची तजवीज केली. त्यासाठी सरकारने टेक होम रेशन ही योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे गेली दोन वर्षे नियमितपणे राज्यातील लाखो अंगणवाडी बालकांना पोषण आहार पोचवण्यात आला.
आता कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आल्याने अंगणवाड्या येत्या दोन दिवसात सुरू (Anganwadi will start) करण्याचा निर्णय घेणार आहोत, अंगणवाड्या सुरू झाल्यानंतर बालकांना पुन्हा गरम ताजा आहार दिला जाईल. यासाठी ४५ निविदा काढण्यात आल्या असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून बालकांना पुन्हा एकदा सकस गरम ताजा आहार अंगणवाड्यांच्या माध्यमातून दिला जाईल अशी ग्वाही ॲड. यशोमती ठाकूर यांनी सभागृहात दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details