महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राफेलची पूजा हे देशाला काळीमा फासण्याचे काम; अंनिसची राजनाथसिंहावर टीका - अंधश्रद्धा निर्मुलन समिती

एकीकडे देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि सत्ताधारी अंधश्रद्धेच्या झोतात अडकून देशाला काळिमा फासण्याचे काम करत आहेत. याचा आम्ही निषेध करतो असे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.

अविनाश पाटील

By

Published : Oct 10, 2019, 11:55 AM IST

मुंबई - विजयदशमी आणि सेनादलाच्या निमित्ताने मंगळवारी राफेल लढाऊ विमान भारतीय हवाई दलात दाखल झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये जाऊन राफेल या लढाऊ विमानाचे पूजन केले होते. विमानावर ओम चिन्ह गिरवले आणि चाकांखाली लिंबू ठेवले होते. मात्र त्यांच्या या पूजा प्रकरणावरून राजनाथसिंह वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. या कृतीचा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने निषेध केला आहे.

अविनाश पाटील

हेही वाचा - 'हे' दृश्य पाहून शरद पवारही विचारात पडले असतील

एकीकडे देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि सत्ताधारी अंधश्रद्धेच्या झोतात अडकून देशाला काळिमा फासण्याचे काम करत आहेत. याचा आम्ही निषेध करतो, असे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.

राफेलच्या पूजेवरून राजनाथसिंह यांच्यावर समाज माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. तसेच राफेलच्या चाकाखाली लिंबु ठेवल्याचा फोटो सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन केले जाते. त्यामुळे राफेलची पूजा करणे इतपत योग्य होते. पण लढाऊ विमानांच्या चाकाखाली लिंबू ठेवणे हे जरा अतिच झाले असल्याची टीका पाटील यांनी केली. तसेच पाटील म्हणाले हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाराच आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या वृत्तीचा अंनिसतर्फे निषेध करत असल्याचे पाटील म्हणाले.

अंधश्रद्धेला खतपाणी घालायला नको - अविनाश पाटील

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेतील आपल्या शेवटच्या भाषणात शक्यता वर्तवली होती. त्यानुसारच आता देशात घडत आहे. देशात विज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली परंतु, देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी अशी कृती करून अंधश्रद्धेला खतपाणी देणे हे कितपत योग्य आम्ही त्यांना विचारणा करू. सर्व देशात भारताची प्रतिमा ही प्रगत होत चाललेला देश अशी आहे. परंतु राजनाथसिंह यांच्या कृतीने देशाला काळीमा फासण्यासारखे आहे.

हेही वाचा - काँग्रेसला नक्कीच आत्मपरीक्षणाची गरज - ज्योतिरादित्य सिंधिया

ABOUT THE AUTHOR

...view details