मुंबई :आरे कॉलनी येथे असलेल्या युनिट २० जवळ पाच दगडी शिल्प आढळली (Ancient stone sculptures in Aarey Colony) आहेत. युनिट २० इथला परिसर अत्यंत कमी वर्दळीचा आहे. या ठिकाणी खूप कमी वेळा लोक ये-जा करत असतात. अशा ठिकाणी आरे कॉलनीतील राहणारा जुबेर अन्सारी या रहिवाशाने हे पाच दगडी शिल्प शोधून काढले आहेत. यामध्ये एक शिल्प हे शिवलिंगाचे आहे. एक सोबतच पाच जुनी, पाच दगडी शिल्प परिसरात सापडल्यामुळे आरे कॉलनी सहित संपूर्ण मुंबईभर याबाबतची चर्चा सुरू (Aarey Colony Mumbai) आहे.
Ancient stone sculptures : आरे कॉलनीत सापडली पुरातन दगडी शिल्प ; पुरातन विभाग करणार पाहणी - आरे कॉलनी मुंबई
मुंबईतील आरे कॉलनीत दगडी शिल्प (Ancient stone sculptures found) आढळली आहेत. पुरातन विभाग लवकरच या परिसरात जाऊन या शिल्पाची पाहणी करणार आहे. या परिसरामध्ये अजून किती असे दगडी शिल्प किंवा पुरातन वस्तू आढळतील याबाबतचा शोध सरकारने पुरातन विभागाच्या माध्यमातून लावला पाहिजे, अशी मागणी केली जात (sculptures in Aarey Colony Mumbai) आहे.
शिल्पाची पाहणी :आरे कॉलनी परिसरात पुरातन शिल्प आढळल्यानंतर पुरातन विभाग लवकरच या परिसरात जाऊन या दगडी शिल्पाची पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. जुबेर अन्सारी हा या भागातील रहिवासी असून त्याने दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व भाग गेल्या अनेक वर्षापासून दगड माती आणि उंच गवतांमुळे झाकला गेला होता. उंच गवत कापण्यासाठी आपण येथे आले असता ते गवत कापल्यानंतर येथे आपल्याला शिव दुर्गा हनुमान शिवलिंग असे शिल्प आढळले. जवळपास 500 वर्षे जुनी ही शिल्प असू शकतात, असेही जुबेर यांचे मत (stone sculptures found) आहे.
दगडी शिल्प : वनशक्ती एनजीओचे सदस्य डी स्टॅलिन यांनीही आरे कॉलनी तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे असे अनेक दगडी शिल्प भेटू शकतील, अशी शक्यता वर्तवली आहे. या भागामध्ये राजाचे वास्तव्य होते. म्हणूनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे कानेरी गुफा तर अंधेरी सिक्स परिसरामध्ये महाकाली गुफा या आढळून येतात. त्यामुळेच या परिसराच्या मध्यभागी असलेल्या आरे कॉलनीत अशा प्रकारची दगडी शिल्प आधीही सापडलेलीआहेत. 2016 या साली देखील अशा प्रकारची दगडी शिल्प सापडण्यात आली होती. मात्र नंतर या शिल्पांचे काय झाले ? याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. पुरातन विभागाला देखील याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.आरेच्या जंगलात आता सापडलेली पाच दगडी शिल्प म्हणजे आश्चर्य आहे. या परिसरामध्ये अजून किती असे दगडी शिल्प किंवा पुरातन वस्तू आढळतील याबाबतचा शोध सरकारने पुरातन विभागाच्या माध्यमातून लावला पाहिजे, अशी मागणी स्टॅलिन यांनी केली (sculptures in Aarey Colony Mumbai) आहे.