मुंबई -वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी केलेले आरोप हे दुर्देवी आहेत. माने हे मोठे नेते आहेत. आमच्या पक्षांमध्ये सर्व जातीचे लोक येत आहेत. ज्या नेत्यांना त्यांच्या पक्षात न्याय मिळत नाही ते आमच्याकडे येत आहेत. मग ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरएस एस यातील ही आहेत. आंबेडकरी चळवळ ही परिवर्तनवादी आहे. म्हणून अशा नेत्यांचे परिवर्तन होते आणि ते वंचित बहुजन आघाडीमध्ये येत आहेत असे रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
लक्ष्मण माने यांनी लावलेले आरोप दुर्देवी- आनंदराज आंबेडकर - वंचित बहुजन आघाडी
लोकसभेत 43 लाख मत घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच फूट पडल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी बी जी कोळसेपाटील यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे मोठे नेते लक्ष्मण माने यांनी आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे लोक घुसले आहे. आता हा पक्ष वंचितांचा राहिलेली नाही, असे आरोप केले आहेत.
लोकसभेत 43 लाख मत घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच फूट पडल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी बी जी कोळसेपाटील यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे मोठे नेते लक्ष्मण माने यांनी आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे लोक घुसले आहे. आता हा पक्ष वंचितांचा राहिलेली नाही, असे आरोप केले आहेत. प्रकाश आंबेडकरांबरोबर काम करता येणार नसल्याचे सांगत राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. याला प्रतिउत्तर देताना आनंदराज यांनी सांगितले की कुटूंबात वाद होत असतात माने यांचेही मतपरिवर्तन होईल.