मुंबई - भाजप सरकारकडून दादर चैत्यभूमी येथे अखंड भीमज्योत उभारली जात आहे. अशी ज्योत उभारणे म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय डाव आहे, असा आरोप बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.
चैत्यभूमीसमोर भीमज्योत उभारणे हा सरकारचा राजकीय डाव - आनंदराज आंबेडकर हेही वाचा -'केंद्रात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र, विकासदर सांगतात फुगवून'
दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे. हे स्मारक भव्यदिव्य व्हावे म्हणून इंदू मिलची जागा सरकाराने ताब्यात घेतली होती. इंदू मिलच्या जागेवर २०१९ पूर्वी आंबेडकरांचे स्मारक उभारले जाईल, असे सरकारमार्फत सांगण्यात आले होते. इंदू मिलच्या जागेवर स्मारकाचा पायासुद्धा रचण्यात सरकारला अपयश आले आहे, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
हेही वाचा - काँग्रेसला दिवसभरात तिसरा धक्का.... कृपाशंकर सिंहांनीही सोडली 'हाताची' साथ
चैत्यभूमी येथे ६ डिसेंबरला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी येतात. बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी १२-१२ तास रांगेत उभे राहतात. मात्र, चैत्यभूमीजवळ असलेल्या अशोक स्तंभाजवळ भीमज्योत उभारून जे लोक १२ तसा रांगेत उभे दर्शन घेतात. त्या लोकांनी भीमज्योतीचे दर्शन घेऊन चैत्यभूमीत जाऊ नये, असा सरकारकडून आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय डाव आखण्यात आला आहे. अशी भीमज्योत उभारून चैत्यभूमीचे महत्व कमी करण्याचा डाव आखला गेल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. या राजकीय डावाला आंबेडकरी जनता फसणार नाही, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले आहे.