महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वादळावर ताड वृक्षाचे तांडव..! आनंद महिंद्रा यांचा व्हिडिओ एकदा पाहाच - anand mahindra tweeter

ताडाचे झाड आनंदाने नाचत होते की ते वादाळाचा आनंद घेत होते, अथवा निसर्गाच्या कोपाचे आनंद घेत होते, हे आपल्याला शोधून काढावे लागेल, असे आनंद महिंद्रा म्हणाले.

ताड वृक्ष मुंबई
वादळाने हेलकावे खाणारे ताड वृक्ष

By

Published : Aug 7, 2020, 2:01 AM IST

मुंबई- काल मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवण विस्कळित झाले होते. पावसासह सोसाट्याचा वारा वाहत होता. वाऱ्यामुळे हेलकावे खाणाऱ्या एका ताडाच्या झाडाचा व्हिडिओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला 2 लाख नागरिकांनी पाहिले असून त्याला 1 हजार 500 पेक्षा जास्त नागरिकांनी रिट्विट केले आहे.

वादळाने हेलकावे खाणारे ताड वृक्ष

ताडाचे झाड गरगर फिरतानाचे व्हिडिओ शेअर करून आनंद महिंद्रा म्हणाले, काल मुंबईतील पावसाबद्दल येणाऱ्या व्हिडिओंपैकी हा व्हिडिओ अत्यंत नाट्यमय आहे. ताडाचे झाड आनंदाने नाचत होते की ते वादाळाचा आनंद घेत होते, अथवा निसर्गाच्या कोपाचे आनंद घेत होते, हे आपल्याला शोधून काढावे लागेल. दरम्यान, महिंद्रा यांचा व्हिडिओ नागरिकांच्या पसंतीस उतरला असून त्याला नागरिकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा-राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोरोना अपडेट एका क्लिकवर..

ABOUT THE AUTHOR

...view details