मुंबई -राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची रविवारी शरद पवारांच्या उपस्थितित महत्वाची बैठक आयोजीत करण्यात आली आहे. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याच पार्श्वभूमीवर रविवारी राष्ट्रवादीची होणारी बैठक महत्वाची मानली जात आहे. ही बैठक पुण्यात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कोअर कमिटीची रविवारी महत्वाची बैठक - ncp coar committee news
रविवारी सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट होणार होती. या भेटीत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करणे, याची चर्चा होण्याची शक्यता होती. परंतू काही कारणास्तव ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक जरी सोमवारी होणार असली तरी रविवारी पुण्यात होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
शरद पवार
हेही वाचा - सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवरच; शरद पवार, सोनिया गांधींची बैठक पुढे ढकलली
रविवारी सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट होणार होती. या भेटीत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करणे, याची चर्चा होण्याची शक्यता होती. परंतू काही कारणास्तव ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक जरी सोमवारी होणार असली तरी रविवारी पुण्यात होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Last Updated : Nov 17, 2019, 7:05 AM IST