पंढरपूर ( सोलापूर )- पंढरपूर येथे एटीएम मशीनमध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यानेच सोळा लाख रुपयांच्या रकमेवर हात साफ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सीएमएम इन्फो सिस्टीम लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ( Pandharpur Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष मोहन दामाजी (रा. इसबावी), असे पैसे लुटलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पंढरपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम सीएमएम इन्फो सिस्टिम लिमिटेड या कंपनीकडे आहे. पंढरपूर एसबीआय शाखेतून विविध एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी 36 लाख रुपये कंपनीचे कर्मचारी आशिष दामाजी व अन्य दोन जण घेऊन गेले होते. पंढरपूर उपनगरातील इसबावी येथे विसावा मंदिर जवळ एसबीआय बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये सोळा लाख रुपये भरणे गरजेचे होते. मात्र, त्यात 14 लाख भरण्यात आले.