मुंबई : देशभरात कोरोना झपाट्याने पसरत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मंगळवारी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 10860 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 20 हून अधिक बॉलिवूड स्टार्स या व्हायरसच्या विळख्यात आले आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांच्या जलसा या बंगल्यातही ( Jalsa Bungalow ) कोरोनाने शिरकाव केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या घरी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे.
Amitabh Bachchan Home : कोरोना पोहोचला अमिताभ बच्चन यांच्या घरापर्यंत, कर्मचाऱ्याला लागण - employee of Amitabh Bachchan's
अमिताभ बच्चन यांच्या घरालाही कोरोनाने थैमान घातले आहे. अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांच्या मुंबईतील जलसा ( Jalsa Bungalow ) येथील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगद्वारे माहिती दिली.

बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये मध्यरात्री लिहून ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिले - मी घरातील कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करत आहे. मी तुमच्याशी नंतर बोलतो. अमिताभ बच्चन यांच्या घरी जलसा आणि प्रतीक्षामध्ये काम करणाऱ्या ३१ कर्मचाऱ्यांची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा ( employee of Amitabh Bachchan's ) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ज्या कामगाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तो जलसा येथील घरातील कर्मचारी आहे. त्याचबरोबर त्यांनी या ब्लॉगसोबतच अमिताभ यांनी त्यांच्या नव्या लढाईबद्दल एक कविताही लिहिली आहे.
गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. तसेच बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एकता कपूर, जॉन अब्राहम व इतर काही स्टार्सना कोरोनाची लागण झाली आहे.