मुंबई -कोरोना लॉकडाऊनमुळे देशभरातील कामगार मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. स्थलांतरित कामगारांचे तर प्रचंड हाल झाले. या कामगारांना अनिवासी भारतीयांनी मदत करावी, असे आवाहन कॅनडा विनीपेग एव्हिएशन ग्लोबल सेल्सचे माजी कार्यकारी संचालक हेमंत एम. शाह यांनी केले.
अनिवासी भारतीयांनी स्थलांतरित कामगारांना मदत करावी - हेमंत शाह
कोविड-१९ मुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, भविष्यात देखील बरेचजण बेरोजगार होणार आहेत. भारतीय असल्याची जाणीव ठेवत सर्व अनिवासी भारतीयांनी दरमहा काही डॉलर्स रक्कम मदत म्हणून दिली पाहिजे, असे आवाहन कॅनडा विनीपेग एव्हिएशन ग्लोबल सेल्सचे माजी कार्यकारी संचालक हेमंत एम. शाह यांनी केले.
कोविड-१९ मुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, भविष्यात देखील बरेचजण बेरोजगार होणार आहेत. भारतीय असल्याची जाणीव ठेवत सर्व अनिवासी भारतीयांनी दरमहा काही डॉलर्स रक्कम मदत म्हणून दिली पाहिजे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत या मोहिमेला अनिवासी भारतीयांचीही हातभार लागेल.
कोणत्याही पीएम फंडाला किंवा सरकारला मदत करण्याची इच्छा नसल्यास स्वयंसेवी संस्थांना निधी पाठवून योगदान देता येऊ शकते. टाटा ग्रुप, विप्रो किंवा इन्फोसिस सारख्या स्वयंसेवी संख्या लोकांसाठी काम करत आहेत. त्यांना निधी मिळाल्यास ते आणखी चांगल्या प्रकारे काम करतील, असे शाह यांनी सांगितले.