महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पलट के आऊंगी' म्हणत अमृता फडणवीसांचा शायरीमधून सूचक इशारा - देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ट्विट करून राज्यातील नागरिकांचे आभार मानले आहेत.

Amruta Fadnavis
अमृता फडणवीस

By

Published : Nov 27, 2019, 12:56 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांना राजीनामा दिला आहे. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सूचक इशारावजा असलेली शायरी ट्विटवरून शेअर केली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ट्विट करून राज्यातील नागरिकांचे आभार मानले आहेत.तुमची वहिनी म्हणून पाच वर्षे संस्मरणीय केले, त्याबद्दल आभार! मी माझ्या क्षमतेने उत्कृष्ट जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. यामागे केवळ सेवा आणि सकारात्मक बदल करण्याचा उद्देश होता.

मी येईन, मी येईन असे विधान करत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचा आत्मविश्वास वेळोवेळी दाखविला. त्यांच्या राजीनाम्यानंतर अमृती फडणवीस यांनी 'पलट के आऊंगी' असे म्हटल्याने त्याची नेटिझन्समध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

राज्यपालांनी 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत महाशिवआघाडीला दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेस व शिवसेनेचे सरकार येण्याचे चित्र जवळजवळ स्पष्ट झालेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details