मुंबई :राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न अनिल जयसिंघानी याने केला होता असा आरोप आहे. त्यामुळे त्याला अटक झाली होती. त्याबाबत त्याने जामीन मिळावा म्हणून सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, त्याचा जामीनाचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. तसेच हा जामीन नामंजूर करत असतानाच गोवा पोलीस तसेच गुजरातच्या ईडीने अनिल जयसिंघानीचा ताबा मागणारा अर्ज सत्र न्यायालयात दाखल केला. त्यामुळे अनिल जयसिंघानीवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न : मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनिल जयसिंघानी याने अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला; असा आरोप करत अमृता फडणवीस यांनी त्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली होती. मात्र, तेथील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. परंतु अतिरिक्त सत्र न्यायालय मुंबई यांनी आज अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
जयसिगानीच्या भावाला जामीन : अनिल जयसिंगानी याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंगानी यांना 30 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अतिरिक्त सत्र न्यायालयाचे जामीन मंजूर केला आहे. मात्र, बुकी अनिल जयसिगानी यांचा जामीन अर्ज नामंजूर केल्यामुळे त्याच्या अडचणी यापुढे वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे. शुक्रवारी 31 मार्च 2023 रोजी मध्य प्रदेश पोलिसांनी बुकी अनिल जयसिगानी यांचा ताबा मागितला होता. तर, आज एक एप्रिल रोजी गुजरातच्या अंमलबजावणी संचलनालयाकडून त्याच्या ताब्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळेच बुकी अनिल जयसिगानी यांच्या कोठडीत मुक्काम वाढण्याची शक्याता आहे.
आधी महाराष्ट्र नंतर मध्य प्रदेश, गोवा आणि आता गुजरातला अनिल जयसिंगानीचा ताबा हवा आहे. या संदर्भात त्यांनी उच्च न्यायालयाकडे ताबा मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. उच्च न्यायालयामध्ये जामीन मिळत नाही त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये बुकी अनिल याच्यावतीने त्याच्या वकिलांनी जामिनासाठी बाजू मांडली होती. मात्र, सरकारी पक्षाच्या वकिलांनी पुन्हा एकदा चौकशीसाठी जयसिंघांनीच्या कोठडीची गरज असल्याचे प्रतिपादन न्यायालयात केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक आलमले यांनी अनिल जयसिंगानी याचा दावा अमान्य केलेला आहे. दरम्यान गुजरात ईडीचे अधिकारी न्यायालयात दाखल झालेले आहेत. मध्य प्रदेश पोलिसांनी तपास केल्यावर गेवा पोलीस, गुजरात ईडी देखील त्याचा ताबा घेईल.
हेही वाचा - Sanjay Raut Threat Case : संजय राऊतांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी; पुण्यातून दोघे ताब्यात, लॉरेन्सविरोधात गुन्हा दाखल