महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amruta Fadnavis Threat Case : अमृता फडणवीस धमकी प्रकरण; डिझायनर अनिक्षाला न्यायालयीन कोठडी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना लाच घेण्याबाबतची धमकी देण्यात आली होती. या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या डिझायनर अनिक्षा जयसिंघानी हिला शुक्रवारी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तिची पोलीस कोठडी वाढवण्याची पोलिसांची विनंती न्यायालयाने फेटाळली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Mar 24, 2023, 6:19 PM IST

मुंबई - उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलीस ठाण्यात 20 फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारे शहर पोलिसांनी 16 मार्च रोजी डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला उल्हासनगरमधून अटक केली होती व तिला मुंबईला आणले होते. तिच्यावर 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. अटक केल्यापासून अनिक्षा पोलिसांच्या कोठडीत होती, तर आता तिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

न्यायालयीन कोठडीत रवानगी - अनिक्षाची पोलीस कोठडी आज संपली आहे त्यामुळे तिला पोलिसांनी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डीडी अलमाले यांच्यासमोर हजर केले होते. विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी अनिक्षाला आणखी तीन दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. अनिक्षाचे वकील मनन संघाई यांनी सांगितले की, पोलीस कोठडी वाढवण्याचे कोणतेही नवीन कारण तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे तिची पोलीस कोठडी वाढवू नये. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत तपासकर्त्यांची याचिका फेटाळून लावत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनिक्षा आता 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत राहणार आहे.

अनिक्षा जयसिंघानीबद्दल माहिती -डिझायनर अनिक्षा जयसिंघानी ही प्रसिद्ध बुकी व आताच पोलिसांच्या तावडीत सापडलेला अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. अनिक्षा जयसिंघानी ही लॉची पदवीधर आहे. बुकी अनिल जयसिंघानीवर महाराष्ट्र, गोवा तसेच आसाममधील सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे, फसवणूक करणे असे अनेक आरोप आहेत. या प्रकरणातही अनिक्षाणे स्वत:ची डिझायनर अशी ओळख सांगितली आहे.

उच्च न्यायालयात धाव -अटकेविरोधात अनिक्षा आणि तिचे वडील बुकी अनिल जयसिंघानी या दोघांनीही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या अनिल जयसिंघानीसुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे. मागील आठवड्यात त्याला गुजरातमधून अटक केली होती. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावाही अनिक्षा आणि अनिल या दोघांनीही केला होता. त्यामुळे वडिल अनिल व अनिक्षा हिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्या ही सुनावणी प्रलंबित आहे.

काय आहे विषय - अमृता फडणवीस यांच्यासोबत संपर्क वाढवून अनिक्षाने त्यांना 10 कोटी रुपयांची लाच देण्याबाबत सांगितले होते. हे सर्व प्रकरण लक्षात आल्यावर अमृता यांनी तिला ब्लॉक केले होते. त्यानंतरही ती अमृता यांना वेगवेगळ्या नंबरवरून व्हिडिओ, ऑडिओ क्लिपस पाठवत होती. माझ्या वडिलांना खोट्या खटल्यात अडकवले असून, त्यांना सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सांगून सोडवण्याची मागणी अनिक्षाने अमृता यांच्याकडे केली होती.

हेही वाचा -Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणारी अनिक्षा अटकेत; कोण आहे डिझायनर आणि अनिल जयसिंघानी?

ABOUT THE AUTHOR

...view details