मुंबई : अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून, मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये 20 फेब्रुवारी रोजी प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यात आला होता. अमृता यांनी आरोप केलेल्या डिझायनरचे नाव अनिक्षा आहे. ती काही काळापासून त्यांच्या संपर्कात होती आणि अनेकदा त्यांच्या घरीही आली आहे. डिझायनर अनिक्षा अमृताला व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि टेक्स्ट मेसेज पाठवून धमकावत होती. तिच्या वडिलांच्या मदतीने कट रचत होत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केला आहे.
षडयंत्र आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल :पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात षडयंत्र आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. एफआयआरनुसार, अनिक्षा गेल्या 16 महिन्यांपासून अमृताच्या संपर्कात होती आणि त्यांच्या घरीही गेली होती. पोलिसांना दिलेल्या निवेदनात अमृता यांनी सांगितले की, ती नोव्हेंबर 2021 मध्ये अनिक्षाला पहिल्यांदा भेटली होती.
उत्पादनांची जाहिरात करण्यास मदत : अनिक्षाने ती कपडे, दागिने आणि पादत्राणे यांची डिझायनर आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते परिधान करण्याची विनंती केली. त्यामुळे तिला उत्पादनांची जाहिरात करण्यास मदत होईल, असे मलबार हिल पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. अनिक्षाने कथितरित्या अमृता यांना सांगितले की, तिची आई आता राहिली नाही. ती तिच्या कुटुंबाची आर्थिक काळजी घेत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.