मुंबई- मंदिरे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पत्र युद्ध सुरू आहे. हिंदुत्वाची आठवण करून देणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
..म्हणून प्रमाणपत्राची गरज भासते, अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - मुंबई बातमी
राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
यानंतर राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या संघर्षावर प्रतिक्रिया आल्या. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे. अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मंगळवारी (दि.13 ऑक्टोबर) रात्री अमृता फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य केले. वाह प्रशासन.! बार आणि दारूची दुकाने सुरू आहेत. मग मंदिरे डेंजर झोन आहेत का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते, अशा खोचक शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. आता यावर शिवसेना नेमकी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -महाराष्ट्रात पुढील २ ते ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता