'जो राम का नहीं, जो हनुमान का नहीं, वो किसी काम का नहीं मुंबई : 'जो राम का नहीं, जो हनुमान का नहीं, वो किसी काम का नहीं और धनुष-बान उनका नहीं.' अशी खोचक टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंना भगवान शिवाचा प्रसाद मिळाला आहे. का झालेल्या सुनावणीन भारतीय निवडणुक आयोगाने 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे 'शिवसेना', धनुष्य-बाण' चिन्ह कायम ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी तत्कालीन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें यांचा चांगलाच समाचार घेतला.
शिवसेनीतील फुटीमागे भाजपचा हात : 2022 साली एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत फुट पाडत आसामधील गुवाहटीला तळ ठोकला होता. त्यांच्यासोबत अपक्ष आमदारांसह शिवसेनेच्या आमदारांचा पाठींबा त्यांना होता. या शिवसेनीतील फुटीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघडी सरकार कोसळले होते. या राजकीय भुकंपामुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात तडे गेले होते.
शिवसेना विरुद्ध शिंदे असा वाद पेटला :राज्यात आलेल्या राजकीय भुकंपामुळे राज्यातील सत्ता अस्थिर झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली होती. तेव्हापासून शिवसेना विरुद्ध शिंदे असा वाद पेटला आहे. या वादावरुन राजकीय वातावरण चांगलेच ढवळुन निघाले आहे. सत्ता स्थापनेच्या काही दिवसानंतर संजय राऊत यांना तुरुंगात जावे लागले होते. तसेच नवाब मलिक यांना देखील तुरुगांत पाठवण्यात आले होते. खासदार संजय राऊत यांनी वारंवार शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांनी हा शिवसेनेवर केलेला हल्ला असल्याचे तेव्हा म्हणाले होते. तसेच केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
नेमके कोण कोणाला संपणार? :ठाकरे यांची सत्ता गेल्यानंतर शिंदे गटाला निवडणुकीला सामोरे जाण्याचे अव्हान दिले होते. आजही पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला करीत निवडणुकीत शिंदे गटाला दाखवुन देऊ असे म्हटले आहे. ते आज मातोश्री बाहेस शिवसैनिकांना संबोधीत करीत होते. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांना निवडणुकीला तैयार राहण्याचे आदेश दिले आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे सामना पुण्यातील पोटनिवडणुकीत कोण विजयी होणार त्यावरुन कळेल असे राजकीय विश्लेकांचे मत आहे. येणाऱ्या आगामी महानगर पालिका निवडणुकीत, तसेच पुण्याती पोट निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ठाकरे गटासाठी या निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेंना अशी नष्ट करता येत नाही असे म्हटले होते. त्यावर शिंदे गटाने देखील जोरदार हल्ला केला आहे. आता नेमके कोण कोणाला संपणार हे येत्या काळात निडणुकीत पहावे लागणार आहे.
हेही वाचा -Uddhav Thackeray Criticized Shinde Group: शिवसेनेला कोणीही संपवू शकत नाही; गद्दारांना धडा शिकवणारच; उद्धव ठाकरेंचा निर्धार