महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amol Kale MCA New President: पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे एमसीएचे नवे अध्यक्ष - क्रिकेटपटू माजी कर्णधार संदीप पाटील

MCA Election 2022: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अध्यक्षपदाचा तिढा सुटला आहे. शदर पवार (Sharad Pawar)- आशिष शेलार (Ashish Shelar) पॅनलकडून अमोल काळेंच्या (Amol Kale) नावाची घोषणा करण्यात आली होती. ज्येष्ठ आणि प्रख्यात क्रिकेटपटू माजी कर्णधार संदीप पाटील यांना 150 मते मिळाली आहेत, तर पवार शेलार पॅनलचे अमोल काळे यांना 183 मते पडले आहेत. थोड्याच वेळात अमोल काळे यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नूतन अध्यक्ष होणार असल्याची अधिकृत घोषणा होईल.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी

By

Published : Oct 20, 2022, 9:27 PM IST

Updated : Oct 20, 2022, 10:37 PM IST

मुंबई:मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अध्यक्षपदाचा तिढा सुटला आहे. शदर पवार (Sharad Pawar)- आशिष शेलार (Ashish Shelar) पॅनलकडून अमोल काळेंच्या (Amol Kale) नावाची घोषणा करण्यात आली होती. ज्येष्ठ आणि प्रख्यात क्रिकेटपटू माजी कर्णधार संदीप पाटील यांना 150 मते मिळाली आहेत, तर पवार शेलार पॅनलचे अमोल काळे यांना 183 मते पडले आहेत. थोड्याच वेळात अमोल काळे यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नूतन अध्यक्ष होणार असल्याची अधिकृत घोषणा होईल.

एकाच मंचावर विराजमान कालच वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब सभागृहामध्ये पवार शेलार पॅनलना सार्वजनिक सभा घेत या निवडणुकीची जय्यत तयारी असल्याचे दाखवून दिलं होतं. राजकीय मत भिन्नता असणारे शरद पवार देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आशिष शेलार ,जितेंद्र आव्हाड अशी मंडळी क्रिकेटच्या निवडणुकीत मात्र एकाच मंचावर विराजमान झाली होती. आणि खेळी मेळीच्या वातावरणात काल एकमेकांना कोपरखळ्या आणि प्रेमळ टोलेबाजी करत कालची सभा या मान्यवरांनी गाजवली.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आशिष शेलार यांनी काल बोलताना सूचकपणे वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यामध्ये अमोल काळे हे अध्यक्षपदी विराजमान होतील, असा तो सुचक इशारा होता. आज तो इशारा खरा ठरला आहे. अमोल काळे यांना संदीप पाटील यांच्यापेक्षा अधिकचे मतदान झालेलं आहे. अमोल कळेना 183 तर ज्येष्ठ क्रिकेटपटू संदीप पाटील यांना 150 मते मिळालेली आहेत. अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. मात्र अधिकचे मतदान अमोल काळे यांना झाले असल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पद त्यांनाच मिळणार ही बाब खात्री लायकरीत्या सूत्रांकडून माहिती मिळाली होती.

कोण आहेत हे अमोल काळे ?अमोल काळे हे मूळचे नागपूरकरचे आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष राहिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तसेच मुंबई क्रिकेट जगात गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचे नाव सतत समोर येत होते. आता एमसीए अध्यक्षपदाकरिता आशिष शेलार यांनी माघार घेतल्याने अमोल काळे हे नवे उमेदवार म्हणून समोर आले होते. त्यानंतर त्यांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. अमोल काळेंविषयी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीचा विचार करता ते नागपूरमध्ये लहानपणापासून आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बालपणापासून ओळखतात. नागपूर विद्यापीठात त्यांनी त्यांचे शिक्षण घेतले आहे. ते बांधकाम आणि आयटी क्षेत्रात व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली आहे. 2019 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशच्या निवडणूकीत अमोल काळे यांना बाळ महाडदळकर या तगड्या गटाकडून उमेदवारी मिळाली आणि ते उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

Last Updated : Oct 20, 2022, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details