मुंबई - कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या महापुराकडे बॉलिवूड स्टार्सनी पाठ फिरवली, असे म्हणणे चुकीचे आहे, असे मत बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईत बोलताना व्यक्त केले. 'कौन बनेगा करोडपती'च्या 11व्या सीझनबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बॉलिवूडने महापुराकडे पाठ फिरवली म्हणणे चुकीचे - बिग बी अमिताभ बच्चन - अमिताभ बच्चन
बॉलिवूडमधून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या मदतीची पब्लिसिटी केलेली नाही. त्यामुळे, याबद्दल कुणाला काही माहीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 'कौन बनेगा करोडपती'च्या 11व्या सीझनबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बॉलिवूडमधून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या मदतीची पब्लिसिटी केलेली नाही. त्यामुळे, याबद्दल कुणाला काही माहीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मी स्वतः सामाजिक कामात दिलेले योगदान सांगणे मला स्वतःला शरमेचे वाटते, असेही ते म्हणाले.
यासोबतच इथे येण्यापूर्वी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करायचे असल्यास त्यासाठी आपली तयारी असल्याचेही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.