मुंबई Amit Shah Lalbagh Raja Darshan : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या निमित्तानं मुंबई दौऱ्यावर आहेत. आज दुपारी पावणे तीन वाजता त्यांचं मुंबईत आगमन झालं. मुंबईत आगमन झाल्याबरोबर त्यांनी सर्वप्रथम मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील गणेशोत्सव मंडळाला सहकुटुंब भेट दिली. त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचंही दर्शन घेतलंय. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा सरचिटणीस विनोद तावडे, खासदार पूनम महाजन, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते. (Ashish Shelars Ganeshotsav Mandal)
लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन :वांद्रे पश्चिम येथील आशिष शेलार यांच्या गणेश मंडळातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांचा ताफा लालबागच्या दिशेनं रवाना झाला होता. याप्रसंगी भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे हे अमित शाह यांच्या स्वागतासाठी पूर्वीपासूनच लालबागच्या मंडपामध्ये उपस्थित होते. लालबागच्या राजाच्या पायावर नतमस्तक होत अमित शाह यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. याप्रसंगी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजप सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. (Amit Shah Mumbai Visit)