महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जेजेत लवकरच कॅन्सर रुग्णालय होणार'... - अमित देशमुख बातमी

जेजे रुग्णालयाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथे कॅन्सर रुग्णालय सुरू केले जाणार आहे. त्यासाठी धोरण आणणार असल्याची घोषणा आज वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात केली.

amit-deshmukh-says-cancer-hospital-to-be-set-up-soon-in-jj-hospital-mumbai
amit-deshmukh-says-cancer-hospital-to-be-set-up-soon-in-jj-hospital-mumbai

By

Published : Mar 3, 2020, 1:33 PM IST

मुंबई- जेजे रुग्णालयाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथे कॅन्सर रुग्णालय सुरू केले जाणार आहे. त्यासाठी धोरण आणणार असल्याची घोषणा आज वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात केली. तसेच वैद्यकीय शिक्षणाला अत्यावश्यक सेवा म्हणून सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा जीआर काढला जाणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.

हेही वाचा-शेवटची इच्छा मालमत्ता अनाथ आश्रमाला द्या!, ठाण्यातील दाम्पत्याची मुलीसह आत्महत्या

प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी मुंबईतील सेंट जॉर्जेस (जेजे) या रुग्णालयातील केमिस्टसची बि‍ले थकल्याने त्या लोकांनी औषध पुरवठा बंद केला असल्याचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यावर देशमुख यांनी 29 कोटी रुपयांची थकबाकी होती. ती पूर्ण अदा करण्यात आली असून आता औषध पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती दिली.

दरम्यान, विक्रम काळे यांनी जेजे रुग्णालय हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने राज्यभरातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे येथे काही निधी उपलब्ध करुन सरकार कॅन्सर रुग्णालय करणार काय? यासाठीचा पुढाकार घेणार काय, असा सवाल केला असता त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी जेजे रुग्णालयाला दीडशे वर्षे पूर्ण होत असून आम्ही तो वर्षे साजरा करताना त्या पार्श्वभूमीवर कॅन्सर रुग्णालय आणण्याचे धोरण आणू अशी घोषणा केली.

तसेच कॅन्सर आणि इतर आजारांसाठी हाफकिन संस्थेकडून होत असलेल्या औषध पुरवठ्याच्या दिरंगाईवर देशमुख म्हणाले की, हाफकीनकडून औषधे खरेदी करण्याचा निर्णय मागे झाला. परंतु, त्यात काही अडचणी येतात. त्यामुळे काही बदल करण्याचा विचार आम्ही केला आहे. तसेच कॅन्सरवर संशोधन करण्याची गरज असून त्यासाठी सरकार निश्चित पावले उचलेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

तसेच आमदारांसोबत खासदारांचेही आरोग्य चांगले राहावे. यासाठी एक योजना आणि धोरण आणले जाईल त्यासाठीचा आराखडा तयार करणार असल्याची माहितीही मंत्री देशमुख यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details