महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील कामा रुग्णालयात १०० बेड वाढवा; अमित देशमुख यांचे निर्देश - कामा रुग्णालयात १०० बेड वाढवा

कामा रुग्णालयात कोविडसाठी स्वतंत्रपणे १०० बेडची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या सव्वा वर्षात या रुग्णालयात कोविडची लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने अजून १०० बेड म्हणजेच एकूण २०० बेड कोविड रुग्णांसाठी ठेवण्याचे नियोजन करण्यात यावे.

मुंबईतील कामा रुग्णालयात १०० बेड वाढवा
मुंबईतील कामा रुग्णालयात १०० बेड वाढवा

By

Published : May 11, 2021, 6:39 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ महिलांसाठी असणाऱ्या कामा रुग्णालयाची ३३० रुग्णांची क्षमता आहे. कोविड काळात या रुग्णालयात १०० बेड कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. कोविड विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता या रुग्णालयात कोविडसाठी अधिकच्या १०० बेड वाढविण्यासंदर्भातील नियोजन करण्यात यावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज (मंगळवार) कामा रुग्णालयाला भेट देऊन या रुग्णालयात कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबद्दल माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते.


'व्हेंटिलेटर याबाबत नियोजन करा'
कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी अधिकाधिक बेडची संख्या वाढवण्यात आली. कामा रुग्णालयात कोविडसाठी स्वतंत्रपणे १०० बेडची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या सव्वा वर्षात या रुग्णालयात कोविडची लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने अजून १०० बेड म्हणजेच एकूण २०० बेड कोविड रुग्णांसाठी ठेवण्याचे नियोजन करण्यात यावे. मात्र हे नियोजन करीत असताना येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याबाबत नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मंत्री अमित देशमुख यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे.


'कामा रुग्णालयाचे नियोजन करा'
मुंबईतील काम रुग्णालयाला १३० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. कामा रुग्णालयाची वास्तू पुरातन वास्तु समजली जात असल्याने या रुग्णालयाचे आत्ताच्या काळानुसार आधुनिकीकरण कसे करता येईल, येथे वेगवेगळ्या कोणत्या सुविधांची वाढ करता येऊ शकेल याबाबतचे नियोजन करण्यात यावे. तसेच येणाऱ्या काळात कामा रुग्णालयात आयव्हीएफ सेंटर सुरु कसे करता येईल याबाबतचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही देशमुख यांनी यावेळी दिले.

हेही वाचा -मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन प्लान्ट उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप; चौकशी करण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details