महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत विशेष' : कोरोनाच्या भीतीनं सुरक्षारक्षकांची कमतरता; खासगी गार्ड्सवर कामाचा ताण

खासगी सुरक्षाव्यवस्था पुरवणाऱ्या अनेक संस्था आहेत. यातील काहींनी कामावर जाण्यास नकार दिल्यामुळे उर्वरित सुरक्षा रक्षकांवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील काही सुरक्षारक्षकांशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी संवाद साधला. पाहुयात यावरील हा विशेष आढावा.

'ईटीव्ही भारत विशेष' : कोरोनाच्या भीतीनं सुरक्षारक्षकांची कमतरता; खासगी गार्ड्सवर कामाचा ताण
'ईटीव्ही भारत विशेष' : कोरोनाच्या भीतीनं सुरक्षारक्षकांची कमतरता; खासगी गार्ड्सवर कामाचा ताण

By

Published : Apr 13, 2020, 6:04 PM IST

मुंबई- संचारबंदीमुळे अनेकांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडलेला आहे. अनेकांनी खबरादारी म्हणून कामावर जाणेच टाळले आहे. संपूर्ण सुरक्षेचा भार डोक्यावर वाहणारे सुरक्षारक्षक मात्र आजही मैदानात शड्डू ठोकून आहेत. राज्यात खासगी सुरक्षाव्यवस्था पुरवणाऱ्या अनेक संस्था आहेत. यातील काहींनी कामावर जाण्यास नकार दिल्यामुळे उर्वरित सुरक्षा रक्षकांवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील काही सुरक्षारक्षकांशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी संवाद साधला. पाहुयात यावरील हा विशेष आढावा.

'जीवावर उदार होऊन ड्युटी करतोय'...पुण्यातील सुरक्षारक्षकांची भावना -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना काही अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांबरोबरच सुरक्षारक्षकही काम करत आहेत. सोसायट्या, बँक, एटीएम अशा अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक काम करत आहेत. पुणे शहरात पुणे पोलीस व प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्रॅमद्वारे शहरात 13 ते 14 हजार सुरक्षारक्षक काम करत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 'स्कॉर्पिअन टास्क फोर्स' या कंपनीतील सुरक्षारक्षकांना कंपनीतर्फे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच कंपनीकडून सुरक्षारक्षकांची जेवणाची व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती स्कॉर्पिअन टास्क फोर्सचे संचालक प्रवीण ढोकले यांनी दिली.

'ईटीव्ही भारत विशेष' : कोरोनाच्या भीतीनं सुरक्षारक्षकांची कमतरता; खासगी गार्ड्सवर कामाचा ताण

'नेहमी काम करत असताना एवढी भीती वाटत नाही. पण आत्ता या लॉकडाऊनमध्ये रात्री ड्युटी करताना भीती वाटते. कंपनीने सर्व सुविधा दिली असली तरी कोणी कसंही वागतं. गेटला हात लावतात..त्यामुळे खूप भीती वाटते..कोरोना होणार तर नाही ना, अशी भीती सध्या खूप वाटते', अशी भावना सुरक्षारक्षक बंटी पाटील यांनी व्यक्त केली.

जळगावातील सुरक्षारक्षकांची आपबिती -

लॉकडाऊनमुळे खासगी सुरक्षारक्षकांवर कामाचा ताण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. विविध कंपन्या, मार्केटमधील दुकाने बंद असल्याने सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षकांना रात्रीच नाही तर आता दिवसाही कामावर थांबावे लागत आहे. जळगाव शहरात सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या सुमारे 10 ते 12 खासगी कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये 2 ते अडीच हजार सुरक्षारक्षक कार्यरत आहेत.

सद्यस्थितीत कोरोनाच्या भीतीमुळे यातील 25 ते 30 टक्के कर्मचारी कामावर येत नाहीत. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे, अशी माहिती जळगावातील ब्लॅक कॅट इंटेलिजन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक ईश्वर मोरे यांनी दिली.

जळगाव शहरात मोठी औद्योगिक वसाहत असून त्यात प्लास्टिक पाईप, ठिबक सिंचन साहित्य, चटई, पेपर निर्मिती करण्यासह दाल मिल, तेल निर्मिती असे लहान-मोठे तब्बल 700 ते 750 उद्योग आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग गेल्या 2 आठवड्यांपासून ठप्प आहेत. याशिवाय शहरात दाणाबाजार, सराफ बाजारदेखील मोठा आहे. या सर्वांची सुरक्षा व्यवस्था खासगी सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून सांभाळली जाते. सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या 10 ते 12 खासगी कंपन्यांचे 2 ते अडीच हजार सुरक्षारक्षक या कामी कार्यरत असतात. लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सर्वच कंपन्या बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने रात्रीच नाही तर दिवसाही सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागत आहे. त्यामुळे खासगी सुरक्षारक्षकांवर कामाचा ताण वाढला आहे.

सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या काही कंपन्यांनी दिवस - रात्र अशा 2 शिफ्ट करून कर्मचाऱ्यांना कामाची विभागणी करून दिली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे 25 ते 30 टक्के सुरक्षारक्षकांनी कामावर येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडला आहे. आगामी काळात लॉकडाऊन अजून वाढण्याची शक्यता असल्याने खासगी सुरक्षा रक्षकांची संख्या अजून घटण्याची चिन्हे असल्याचेही ईश्वर मोरे यांनी सांगितले.

कोल्हापुरात खासगी सुरक्षारक्षकांवर ताण -

कोल्हापूर जिल्ह्यात खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या जवळपास दहा-बारा संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून जिल्हाभरात तीन ते चार हजारांवर सुरक्षारक्षक काम करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात दरमहा 2 ते 3 कोटींची उलाढाल होत असते. शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच, महावितरण, एसटी महामंडळ, सरकारी व अन्य सर्व बँका, वित्तीय संस्था, बँकांचे एटीएम, उद्योग-कंपन्या, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, व्यावसायिक प्रतिष्ठाने, गुदाम, मोठे बंगले आणि एवढेच नव्हे तर मोठ्या देवस्थानांच्या ठिकाणीही सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. पण सध्या यामध्ये अनेक अडचणी येत आहेत.

अनेक सुरक्षारक्षकांकडे स्वतःची वाहने नाहीत. परगावाहून शहरात नोकरीला येत असतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने ते आपापल्या गावी अडकून आहेत, तर ज्यांना शक्य आहेत ते सर्व सेवा देत आहेत. शिवाय अनेक ठिकाणी कर्मचारी ओव्हरटाईमसुद्धा करत आहेत. त्यामुळे कामाचा ताण वाढला असल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details