महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime : अमेरिकी अभियंत्याचा चोरीला गेलेला लॅपटॉपचा अवघ्या 2 तासात लावला शोध; दोघांना अटक

एका अमेरिकी अभियंत्याची (एनआरआय) लॅपटॉपची बॅग चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अवघ्या दोन तासांत शोधून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून लॅपटॉप जप्त करून अभियंत्याला परत केला. बोरिवली रेल्वे पोलिसांनी ही स्तुत्य कामगिरी केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे चौफेर कौतुक केले जात आहे. मोहम्मद अर्शद मोहम्मद आझाद (21) आणि मोहम्मद इस्लाम इद्रिस (2) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी पश्चिम बंगाल 24 परगणा येथील रहिवासी आहेत.

Mumbai Crime
लॅपटॉप चोरांना अटक

By

Published : Jan 11, 2023, 7:44 PM IST

लॅपटॉप चोराला करण्यात आलेल्या अटकेविषयी सांगताना पोलीस

मुंबई :बोरिवली जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले की, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे राहणारे ६० वर्षीय बाल गोविंद शर्मा (३०) हे यापूर्वी पवई आयआयटीमध्ये टॉपर होते. त्यानंतर अमेरिकन सरकारने त्यांना अमेरिकेत बोलावून नागरिकत्व दिले. पवई IIT मध्ये टॉपरला 30 वर्षे पूर्ण झाल्यामुळे पवई IIT तर्फे त्यांचे व्याख्यान आणि गेट-टू-गदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यात बाल गोविंद शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.

लॅपटॉप केला परत :बोरिवलीला पोहोचल्यानंतर फिर्यादी शर्मा यांना थोडा थकला आला होता. त्यामुळे ते स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये आराम करू लागले. या संधीचा फायदा उचलून दोन चोरट्यांनी त्यांची लॅपटॉपची बॅग घेऊन पळ काढला. पोलिसांनी सांगितले की, तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना बोरिवली पूर्व येथून अटक केली आणि बाल गोविंद शर्मा यांचा लॅपटॉप परत केला. आतमध्ये लॅपटॉपशिवाय त्यांचा मोबाईल फोनही होता, जो पोलिसांनी जप्त केला आहे.

मुंबई रेल्वे पोलिसांची कर्तव्यदक्षता : पोलिसांनी त्यांच्या कार्यतत्परतेचा परिचय देत प्रवाशांची लॅपटॉपची बॅग चोरणाऱया एका टोळीला ऑगस्ट, 2019 मध्ये अटक केली होती. टोळीतील सदस्य लोकलमध्ये झोपी गेलेल्या प्रवाशांची लॅपटॉप बॅग चोरायचे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी चार लॅपटॉप चोरांना अटक केली होती. मोहमद इस्माईल, मनीष शेंडे, आकाश गरेवाल, अकबर खान या चार जणांना अटक करण्यात आली होती. मनीष शेंडे व अमन गरेवाल हे दोघेही सराईत लॅपटॉप चोर आहेत. गेल्या काही दिवसात या दोघांनी बांद्रा ते गोरेगाव या दरम्यान 7 लॅपटॉप चोरले होते. आरोपी लोकलमध्ये प्रवासी झोपी जाण्याचे वाट पाहायचे आणि संधी साधून हातोहात बॅग लंपास करून पळून जायचे.

हेही वाचा :Jalna Crime : शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; उर्दू शाळेतील धक्कादायक घटना

ABOUT THE AUTHOR

...view details