महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूर्वद्रुतगती महामार्गावरील खड्ड्यात आदळली रुग्णवाहिका; अत्यावश्यक सेवेस उशीर

पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी ते भांडुप दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. बुधवारी उशिरा रात्री एक रुग्णवाहिका या महामार्गावरुन जात होती. ही रुग्णवाहिका कल्याणवरून एका रुग्णाला उपचारासाठी मुंबईकडे घेऊन जात होती.

हाच तो जीवघेना खड्डा

By

Published : Sep 19, 2019, 12:25 PM IST

मुंबई- शहर आणि उपनगरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. यात पूर्व द्रुतगती महामार्गसुध्दा सुटला नाही. काल रात्री विक्रोळी ते भांडुप मार्गादरम्यान असलेल्या एका खड्ड्यात रुग्णवाहिका आदळली. त्यामुळे रुग्णावाहिकेतील रुग्णाला उपचारासाठी नेण्यास उशीर झाला. या घटनेमुळे वाहनचालकांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

रुग्णवाहिका खड्ड्यात आदळल्याची दृश्ये

पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी ते भांडुप दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. बुधवारी उशिरा रात्री एक रुग्णवाहिका या महामार्गावरुन जात होती. ही रुग्णवाहिका कल्याणवरून एका रुग्णाला उपचारासाठी मुंबईकडे घेऊन जात होती. महामार्गावरून विक्रोळी ते भाडूप दरम्यान प्रवास करत असताना ही रुग्णवाहिका मर्गावारील एका खड्ड्यात आदळली. त्यामुळे गाडीच्या टायर आणि डिस्कचे नुकसान झाले. परिणामी या रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला.

हेही वाचा-अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला मनसेचे सडेतोड उत्तर

भांडूप ते विक्रोळी मार्गादरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहे. अंधारात वेगाने जाणाऱ्या वाहनांना मार्गावरील खड्डे दिसत नसल्याने ते त्यात आदळतात. त्यामुळे गाडीचालकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सदरील घटनेनंतर वाहनचालकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details