महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यात रक्तदान करून भीमसैनिकांनी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची अनोखी सुरुवात - कोरोना

प्रत्येक वर्षी आंबेडकरी जनतेला एप्रिल महिन्याची प्रतीक्षा असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची तयारी आणि विविध कार्यक्रमाची लगबग महिनाभर सुरु असते. मात्र, देशात कोरोना विषाणूचे संकट उभे राहिल्याने भीमसैनिकांचा बालेकिल्ला असलेल्या चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत यावर्षीच्या जयंतीमध्ये ना कोणतीही विद्युत रोषणाई ढोल-ताशा किंवा मोठा कोणताही कार्यक्रम न घेता आज सुरक्षित अंतर व कोणतीही गर्दी नकरता रक्तदान करून जयंतीची सुरुवात करण्यात आली.

ambedkari youth donates blood to celebrate birth anniversary of babasaheb ambedkar
आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यात रक्तदान करून भीमसैनिकांनी केली डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीची अनोखी सुरवात

By

Published : Apr 3, 2020, 7:43 AM IST

मुंबई-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुंबईतील भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीच्या कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान करत अनोख्या पद्धतीने केली आहे. भीमसैनिकांचा बालेकिल्ला असलेल्या चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत यावर्षीच्या जयंती मध्ये ना कोणतीही विद्युतरोषणाई ढोल-ताशा किंवा मोठा कोणताही कार्यक्रम न घेता आज सुरक्षित अंतर व कोणतीही गर्दी नकरता रक्तदान करण्यात आले.

आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यात रक्तदान करून भीमसैनिकांनी केली डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीची अनोखी सुरवात
चेंबूरचा सिध्दार्थ कॉलनी परिसर आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ला म्हणून परिचित असून या ठिकाणाहून अनेक चळवळी व आंदोलने पार पडली आहेत. देशावर आलेल्या कोरोना संकटाच्या वेळी देशहित व आरोग्याची परिस्थिती पाहता आंबेडकर जयंतीचा उत्साह बाजूला ठेवून आज परिसरातील भीमसैनिकांनी एक दुसऱ्यामध्ये 5 ते 6 फुटांचे अंतर ठेवून शांततेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले

राज्यात रक्ताच्या साठ्याचा तुटवडा आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच प्रसार माध्यमांसमोर वक्तव्य केले होते. सिध्दार्थ कॉलनीतील युवकांनी रक्तदान शिबीर घेत कोरोना विषाणूच्या या संकटात विभागातील सर्व नागरिकांनी घरातच राहून आपला परिवार सुरक्षित ठेवावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन या शिबिरातून युवकांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details