मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचे तीव्र पडसाद उमटत ( Ambadas Danve warning ) आहेत. महाविकास आघाडीचा येत्या 17 डिसेंबरला महामोर्चा होणार आहे. त्यापूर्वीच राज्यपालांनी महाराजांची माफी मागत, केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून सल्ला मागितला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, माफीवीर राज्यपालांची हकालपट्टी झाली ( Dismiss Maharashtra Governor ) पाहिजे. तसेच महाराष्ट्राच्या मातीला दुषणे देणाऱ्यांना ठेचल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा दानवे यांनी ट्वीटवरुन दिला ( Ambadas Danve Tweet ) आहे.
Ambadas Danve : महाराष्ट्राच्या मातीला दुषणे देणाऱ्यांना ठेचणार; अंबादास दानवेंचा इशारा - Dismiss Maharashtra Governor
अंबादास दानवे यांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी केली ( Dismiss Maharashtra Governor ) आहे. महाराष्ट्राच्या मातीला दुषणे देणाऱ्यांना ठेचल्याशिवाय शांत बसणार नाही, असे ट्वीट अंबादास दानवे यांनी केले ( Ambadas Danve Tweet ) आहे.
![Ambadas Danve : महाराष्ट्राच्या मातीला दुषणे देणाऱ्यांना ठेचणार; अंबादास दानवेंचा इशारा Ambadas Danve Bhagat Singh Koshyari](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17183860-thumbnail-3x2-sdbgfnhj.jpg)
छत्रपती शिवरायांचा अवमान : छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचे प्रकरण तापलेले असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले. विरोधकांनी यावरुन राज्यपालांना धारेवर धरले आहे. पत्र आणि राज्यपालांच्या भावना ढोंगी असल्याचा आरोप आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही हल्लाबोल (Those who harm Maharashtra soil will be crushed ) केला.
महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा अवमान केल्या प्रकरणी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्र लिहून भूमिका स्पष्ट केली, यातूनच त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे स्पष्ट होत आहे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण देणे हा देखील महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रकार आहे. माफीवीर हा विषय आता थांबणार नाही. राज्यपालांची हकालपट्टी व्हायला हवी. दिल्लीला केलेला पत्रलेखन हे उरलेली अब्रू वाचवण्यासाठी सुरु असलेला खटाटोप आहे. महाराष्ट्राचे मीठ खाऊन मातीला दुषणे देण्याची वृत्ती ठेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हे केंद्र आणि राज्यपालांनी ध्यानात ठेवावे, असा इशारा दिला.