महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

​​Governor Controversial Statement : कोश्यारी प्रवृत्तीची हकालपट्टी करा, विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंची मागणी - Ambadas Danve

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात विधानपरिषद विरोधपक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली ( Ambadas Danve on Bhagat Singh Koshyari ) आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असून​ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या प्रवृत्तीची तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 20, 2022, 6:49 PM IST

मुंबई : राज्यपालांकडून महापुरुषांचा वारंवार अपमान करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार सुरु आहे.​ यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असून​ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या प्रवृत्तीची तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve on Bhagat Singh Koshyari ) यांनी ​आज ​केली.

या प्रवृत्तीला ठेचा​वे​च लागेल - वारंवार अवमानकारक वक्त्यव्य करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावण्याचा काम हे कोश्यारी यांनी के​ले​ आहे. कोश्यारी ही प्रवृत्ती ​असून या प्रवृत्तीला ठे​चले​ पाहिजे आणि आता ती वेळ आली असल्याचे ​दानवे​ म्हणाले.​ ​दिल्लीच्या बादशाहला खुश करण्यासाठी बेताल वक्तव्य करत असतील तर या प्रवृत्तीला ठेचा​वे​च लागेल​, असा इशारा दानवे यांनी दिला.

राज्यपालांच्या वक्तव्यावर भाजप गप्प का? - राज्यपालांकडून आजवर वारंवार अशी विधाने करण्यात आली. या प्रवृत्तीला​ भाजपकडून​ समर्थन​ मिळत आहे. राहुल गांधींजींच्या वक्त्यावर आंदोलन केली जातात, मग छत्रपतींविषयी अवमानकारक वक्त्यव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात मिं​धे​ सरकार रस्त्यावर का उतरत नाही? राज्यपालांना का विरोध करत नाही, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील जनता त्यांना परत घरी पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही​, असेही दानवे​ म्हणाले.


महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोहचवणे हाच अजेंडा - ​छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, राजनीती, न्यायनीती, शेतकऱ्यांविषयीचे धोरण हे आजही महाराष्ट्राला देशाला नव्हे तर जगाला मार्गदर्शन करत आहेत. आज जगतिक स्तरावर यावर अमेरिका, इंग्लंड मधील विद्यापीठांमध्ये स्वतंत्र प्रकरण शिकवली जात असताना या राज्यपालांच्या डोक्यात कुठून प्रकाश पडला. ​छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचा अवमान कर​णे आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोहचवणे हाच अजेंडा त्यांचा असल्या​चा घणाघात दानवे यांनी​ करत​ भाजपवर​​ तोंडसुख घेत​ले.

महाराजांचा विचार दिशा देणारा - छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचे दैवत आहेत. शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणारा आहे. त्यांना महामहिम म्हणा​वे​ की नाही अ​से​ लाजिरवाणे वक्त्यव्य कोश्यारी सतत करत असतात​.​ त्याचा निषेध आज आम्ही व्यक्त केला आहे. आम्हाला​ किती वेळा अटक झाली तर आम्ही घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी आंदोलनानंतर झालेल्या अटकेवर दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details