महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ambadas Danve : 'प्रस्तावित वाढवण बंदर रद्द करा, अन्यथा सरकारचं पिंडदान करू'

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve ) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. प्रस्तावित वाढवण बंदर रद्द करा.अन्यथा प्रभू श्रीरामाने या ठिकाणी दशरथाच पिंडदान केलं, तसं आम्हाला सरकारच पिंडदान करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

प्रस्तावित वाढवण बंदर रद्द करा
प्रस्तावित वाढवण बंदर रद्द करा

By

Published : Nov 21, 2022, 8:58 PM IST

मुंबई - पर्यावरण विभागाने ( Department of Environment ) अतिसंवेदनशील भाग घोषित केला असताना सरकार मनमानी करत आहे. प्रस्तावित वाढवण बंदर रद्द करा.अन्यथा प्रभू श्रीरामाने या ठिकाणी दशरथाच पिंडदान केलं, तसं आम्हाला सरकारच पिंडदान करावे लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve ) यांनी दिला. आज जागतिक मच्छिमार दिनानिमित्त ( occasion of World Fishermen Day ) वाढवण बंदर रद्द व्हावे, या मागणीसाठी वाढवण बंदर संघर्ष समितीने मुंबईतील आझाद मैदान ( Mumbai Azad Maidan ) येथे धरणे आंदोलन केले. वाढवणच्या कोळी बांधवांना यावेळी दानवे यांनी संबोधन केले.

प्रस्तावित वाढवण बंदर रद्द करा

कोळी बांधवांना न्याय देऊ -येत्या हिवाळी अधिवेशनातील सभागृहात प्रस्तावित वाढवण बंदर रद्द करण्याचा विषय उचलून धरू व महाराष्ट्र दणादून सोडून कोळी बांधवांना न्याय देऊ असा संकल्प दानवे यांनी केला. तसेच कोळी बांधवांच्या न्यायासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करू असे अभिवचन दानवे यांनी उपस्थित कोळी बांधवांना दिले.


वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे -पर्यावरण व सामाजिक दृष्टीने बंदर होऊ नये. २०१४ ला आलेल्या मोदी सरकारच्या कालावधीत बंदर बांधणीच्या प्रस्तावाला वेग आला. केंद्र सरकारला संघर्ष करणारा कोळीबांधव नको तर अदानी अंबानीसारखे धनदांडगे हवे, अशी टीका दानवे यांनी केंद्र सरकारवर केली. मात्र शिवसेना काय, सर्वसामान्य कोळीबांधवांसोबत राहणार असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली.


स्थानिक जनतेचा बंदराला विरोध -स्थानिक जनतेचा विरोध असताना मूठभर उद्योजक असलेल्या धनदांडग्यांचा फायदा करण्यासाठी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून केंद्र सरकार बंदर करण्याचा घाट घालतेय त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विरोध दर्शवल्याचे दानवे म्हणाले. यावेळी आमदार सुनील प्रभू, सुनील शिंदे, कपिल पाटील व समितीचे पदाधिकारी व मोठया संख्येने कोळीबांधव उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details