मुंबई - मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलमधील मालडब्यात अमेझॉन या ऑनलाईन मालविक्री करणाऱ्या कंपनीला मालवाहतूक करण्यास रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली आहे.
उपनगरीय लोकलच्या मालडब्यात होणार अमेझॉनची मालवाहतूक - amazon shipping mumbai latest news
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या लोकलच्या मालडब्यात ही वाहतूक होणार आहे. अमेझॉनला करारानुसार सीएसएमटी ते कल्याणच्यामध्ये कुठेही माल उतरवता येणार नाही. यामुळे अमेझॉनची सेवा जलद होणार आहे. मध्य रेल्वेला यातून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या लोकलच्या मालडब्यात ही वाहतूक होणार आहे. अमेझॉनला करारानुसार सीएसएमटी ते कल्याणच्यामध्ये कुठेही माल उतरवता येणार नाही. यामुळे अमेझॉनची सेवा जलद होणार आहे. मध्य रेल्वेला यातून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. याआधी हा उपक्रम ईस्टर्न रेल्वेत सुरु करण्यात आला आहे. किमान 8 टन माल हा उपनगरीय लोकलमधून वाहण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने अमेझॉनला दिली आहे. सध्या 3 महिन्यांसाठी हा उपक्रम प्रयोगिक तत्वावर रेल्वेकडून सुरु करण्यात आला आहे. यातून मध्य रेल्वेला 6 लाख 10 हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे.
नॉन पीक अवर्समध्ये ही वाहतूक होणार असल्याने याची कोणतीही गैरसोय प्रवाशांना होणार नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.