महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आरे'नंतर परळ कारशेडमधील दीड हजार झाडांवर कुऱ्हाड? - परळ कारशेड वृक्षतोड

मुंबईच्या मध्यभागात असलेल्या परळ कारशेडच्या जागी परळ टर्मिनसचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. या टर्मिनससाठी कारशेड सोबतच या परिसरात असलेली हेरिटेज इमारत, सुमारे 1500 पेक्षा जास्त झाडे तोडण्यात येणार आहेत.

परळ कारशेडमधील दोन हजार झाडांवर कुऱ्हाड
परळ कारशेडमधील दोन हजार झाडांवर कुऱ्हाड

By

Published : Jan 15, 2020, 9:50 PM IST

मुंबई - आरेतील मेट्रो कारशेडसाठी रातोरात वृक्षतोड केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी झाला होता. आरेतील वृक्षतोडीनंतर आता मध्य रेल्वेच्या परळ कारशेडमधील सुमारे दीड हजार झाडे तोडण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

परळ कारशेडमधील दोन हजार झाडांवर कुऱ्हाड


मुंबईच्या मध्यभागात असलेल्या परळ कारशेडच्या जागी परळ टर्मिनसचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. या टर्मिनससाठी कारशेड सोबतच या परिसरात असलेली हेरिटेज इमारत, सुमारे 1500 पेक्षा जास्त झाडे तोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा - अ‌ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी महात्मा गांधींना वाहिली आदरांजली

नारळ, आंबा, वड, पिंपळ आणि पळस यासारख्या अनेक झाडांचा यामध्ये समावेश आहे. ही झाडे तोडण्याला मध्य रेल्वेच्या सेंट्रल मजदूर युनियनने विरोध दर्शवला आहे. झाडे वाचवण्यासाठी यूनियनने झाडांची गणना केली, असून त्यावर नंबरदेखील टाकले आहेत. लवकरच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहोत, असे संघटनेचे महामंत्री डॉक्टर प्रवीण बाजपेयी यांनी सांगितले.


आरेतील मेट्रो कारशेडसाठी तोडण्यात आलेल्या झाडांसाठी जनआंदोलन उभारण्यात आले होते. तशाच प्रकारे परळ येथील झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, असे यूनियनचे सचिव अमित भटनागर म्हणाले. मात्र, याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना विचारले असता त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली जाईल असे, सांगून या विषयाला बगल दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details