महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Allopathy or Ayurveda : ऍलोपथी की आयुर्वेद? महत्त्वाची औषधोपचार पद्धत कोणती? पुन्हा रंगला वाद! - e Most Important Treatment

आयुर्वेद की ऍलोपॅथी हा वाद फार पूर्वीपासून व न संपणारा आहे. या वादावर आतापर्यंत अनेकदा चर्चाच नाही तर महाचर्चा सुद्धा रंगल्या आहेत. परंतु आताच सर्वोच्च न्यायालयाने आयुर्वेदिक डॉक्टरांना ऍलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे वेतन दिले जाऊ शकत नाही. असा महत्त्वाचा निर्णय दिल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वास्तविक दोन्ही ऍलोपथी व आयुर्वेद हे दोन्ही आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

Allopathy or Ayurveda medicine
ऍलोपथी की आयुर्वेद औषधोपचार

By

Published : Apr 28, 2023, 9:04 PM IST

डॉक्टर दीपक सावंत माहिती देताना

मुंबई: शासकीय रुग्णालयामध्ये काम करणारे आयुर्वेदिक डॉक्टर हे ऍलोपॅथी डॉक्टरांच्या बरोबरीचे नसल्याचे स्पष्ट करत आयुर्वेदिक डॉक्टरांना ऍलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे समान वेतन लागू करता येणार नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर पुन्हा एकदा ऍलोपथी व आयुर्वेद या दोन्ही डॉक्टरांविषयी असलेला जुना वाद नव्याने निर्माण झाला आहे. ऍलोपथी व आयुर्वेद या दोन्ही बाबी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्यातरी यात श्रेष्ठ कोण यावर आजही प्रश्नचिन्ह आहे.



वादावर आतापर्यंत अनेकदा चर्चा:आयुर्वेद की ऍलोपॅथी हा वाद फार पूर्वीपासून व न संपणारा आहे. या वादावर आतापर्यंत अनेकदा चर्चाच नाही तर महाचर्चा सुद्धा रंगल्या आहेत. परंतु आताच सर्वोच्च न्यायालयाने आयुर्वेदिक डॉक्टरांना ऍलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे वेतन दिले जाऊ शकत नाही. असा महत्त्वाचा निर्णय दिल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना, ऍलोपॅथी डॉक्टर प्रमाणे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा ह्या आयुर्वेदिक डॉक्टरांना द्यावा लागत नसल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे आयुर्वेदिक व्यवसायिक हे एमबीबीएस पदवीधर डॉक्टरांच्या संकेत मानले जाण्यास पात्र आहे, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने यापूर्वी २०१२ मध्ये दिला होता. तब्बल ११ वर्षानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश रद्द केला आहे. या मागील ११ वर्षांमध्ये मागील ३ वर्षे ही करोना मध्ये गेली. त्या दरम्यान आयुर्वेद असो किंवा ऍलोपॅथीक असो दोन्ही बाजूच्या डॉक्टरांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे हे सुद्धा विसरता येणार नाही.



आकस्मिक कामे करण्यास सक्षम: आयुर्वेद व ऍलोपॅथी या दोन्ही पद्धतीमध्ये ज्या उपचार विज्ञानाचा अवलंब करण्यात येतो व त्याचे जे स्वरूप असते ते बघता आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ऍलोपथी डॉक्टर आकस्मिक कामे करण्यास सक्षम असतात. तसेच त्यांना गंभीर जखमींवर तातडीने उपचार करावे लागतात. परंतु हे आयुर्वेदिक डॉक्टर प्रामुख्याने करू शकत नाहीत. त्याचप्रकारे एमबीबीएस पदवीधर डॉक्टर हे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करू शकतात, तसे आयुर्वेदिक डॉक्टरांना करता येत नाही. ऍलोपॅथी डॉक्टरांना दिवसाला शेकडो रुग्णांवर उपचार करावे लागतात, तसे आयुर्वेदिक डॉक्टरांना करावे लागत नाही. आयुर्वेद व पर्यायी किंवा स्वदेशी औषध पद्धतीला प्रोत्साहन देणे हे आवश्यक असले तरी, ऍलोपथी डॉक्टरांच्या श्रेणी बरोबर त्यांना वेतन दिले जाऊ शकत नाही? हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याने ऍलोपथी डॉक्टरांच्या माना उंचावल्या आहेत.

आयुर्वेदिक उपचार मुळांपासून उच्चाटन: आयुर्वेदिक डॉक्टर उत्तम कुंभारे यांच्या म्हणण्यानुसार, आजही आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर अनेक जणांचा लवकर विश्वास बसत नाही. तसेच आयुर्वेदावर अनेक बंधन लादली गेली आहेत. ऍलोपॅथी औषधाप्रमाणे आयुर्वेदिक औषध सर्वांपर्यंत पोहचवली जात नाही. जगभरात जर आयुर्वेदाचे महत्त्व वाढले तर त्याची मागणी वाढेल. ऍलोपॅथी औषध लक्षणांवर उपचार करणाऱ्यावर लक्ष केंद्रित करते, तर दुसरीकडे आयुर्वेद मध्ये आजार मुळांपासून उपटून टाकण्याचा प्रयत्न होत असतो. तसेच शरीरावर कुठलाही दुष्परिणाम होण्याची शक्यता सुद्धा नसते. ऍलोपॅथी
मध्ये शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते, असेही कुंभारे म्हणाले.



आजही गूढच आहे:प्रत्येक व्यक्ती किंवा कुटुंब आपापल्या मर्जीनुसार आयुर्वेदिक की ऍलोपॅथी याचा पर्यायी मार्ग शोधतो. आयुर्वेद हे पारंपरिक आणि जटिल उपचार विज्ञान आहे. विविध संस्कृतीमध्ये आयुर्वेद आणि ऍलोपॅथी बद्दल भिन्न विचारधारणा आहे. निसर्गोपचार आणि शाकाहारी पसंद करणारे बहुतेक लोक हे आयुर्वेदिक औषधाकडे आकर्षित होतात. तर जगभरातील वैद्यकीय मंडळांनी ऍलोपथीला मान्यता दिल्याने अनेकजण त्याच्याकडे आकर्षित होतात. परंतु ऍलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिक श्रेष्ठ आहे का? किंवा आयुर्वेदिक पेक्षा, ऍलोपॅथी श्रेष्ठ आहे का? हे आजही गूढच आहे.




उपचारासाठी कुठला खर्च अधिक ?: जे ऍलोपॅथिक औषधाचा वापर करतात त्यांना माहित असते की, ती किती महाग आणि वेळ खाऊ असतात. प्रचंड महागडी अशी ऍलोपॅथिक औषधे रुग्ण अनेकदा विकत घेतात. अनेकदा इतके असून सुद्धा त्यांना त्यात आराम येईल याची शक्यता नसते. त्या तुलनेत आयुर्वेदिक उपचार पद्धती ही जीवनशैलीच्या दुरुस्तीच्या संकल्पनेत रुजलेली आहे. व ती प्रभावी आणि कमी खर्चाची असल्याने तसेच नैसर्गिक आणि साध्या उपचार आयोगाचे लक्ष केंद्रित असल्याने, ती अधिक इतिहासशीर आणि अधिक कायमस्वरूपी आणि सकारात्मक जीवन बदलणारी असल्याचेही म्हटले जाते.



ऍलोपथी व आयुर्वेद हे दोन्ही आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे:सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितले आहे की, वास्तविक दोन्ही ऍलोपथी व आयुर्वेद हे दोन्ही आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कारण कोविड १९ मध्ये ऍलोपथी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून आयुर्वेद डॉक्टरांनी सुद्धा जे काम केले आहे, त्याला तोड नाही. त्याने कित्येक रुग्णांचे प्राण वाचले गेले. पण जेव्हा हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर आला तेव्हा अनेक बाबींची मीमांसा करण्यात आली. त्यांचे शिक्षण, ज्ञान, त्यांना सर्जरी करण्यासाठी देण्यात आलेली मुभा या सर्व बाबींचा विचार करूनच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. तरीसुद्धा सर्वकश विचार करता राज्याने आयुर्वेद डॉक्टरांविषयी सकारात्मक विचार करावा असेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Ayurveda For Treating Long Covid दीर्घ कोरोना लक्षणांच्या रुग्णांसाठी आयुर्वेदिक उपचार प्रभावी

ABOUT THE AUTHOR

...view details