मुंबई: अखेर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. आज युती संदर्भात शहा आणि ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यानंतर मागील चार वर्षापासून दोन्ही पक्षात सुरु असणारी तूतु मै मै थांबली आहे.मुख्यमंत्र्यांनी याबाबतची युतीचा फॉर्म्युला
शिवसेना-भाजप लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी युती, मुख्यमंत्र्यांची घोषणा - election
लोकसभा निवडणुकीत भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवेल.
युती
स्वतः घोषणा केली.
- लोकसभा निवडणुकीत भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवेल.
- भाजपकडे असणारी पालघरची जागा शिवसेनेला देण्यात येईल.
- विधानसभेसाठी मित्र्पक्षासोडून उरलेल्या जागा निम्या-निम्या लढविल्या जातील
- भाजपकडून मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या जागांवर शिवसेना निवडणूक लढवू शकेल
- राम मंदिर आणि हिंदुत्व हा युती होण्यासाठी महत्वाचा धागा
- शेतकऱ्यांच्या प्रश्नी शिवसेना आग्रही, पीकविम्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार, कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळणार
- शिवसेना-भाजपमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद, मात्र हिंदुत्वाचा मुद्दा समान
पत्रकार परिषदेतल महत्वाचे मुद्दे –
- सेना-भाजप आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवणार
- नाणार संदर्भात उद्योग विकासाला विरोध नाही, पण नाणार प्रकल्पाची जागा बदलणार : मुख्यमंत्री
- लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23, भाजप 25 जागांवर लढणार : मुख्यमंत्री
- सत्ता, पदे याला महत्व न देता शेतकरी, गरीबांचे व्यापक प्रश्न घेऊन युतीचा निर्णय : मुख्यमंत्री
- नाणार प्रकल्पासाठी जमीन देण्यासाठी स्थानिकांचा विरोध असल्यास जमीन अधिग्रहण होणार नाही