महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

‘जातीभेद अमंगळ’ हा विचार आजच्या पिढीत रूजवणारं ‘अल्ला विठ्ठला’ गाणं आषाढीच्या मुहूर्तावर रिलीज - अल्ला विठ्ठला गाणं आषाढीच्या मुहूर्तावर रिलीज बातमी

यंदा 'कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त लाखों वारकरी वारीसाठी जाऊ शकले नाहीत. परंतु, 'बोलावा विठ्ठलं, पहावा विठ्ठलं', या उक्तीप्रमाणे विठ्ठल विचारातून अनुभवता यावा, यासाठी धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन सर्वधर्म समभावाचा वारीचा संदेश पोहचवण्यासाठी 'अल्ला विठ्ठला' या एका वेगळ्या गाण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.

अल्ला विठ्ठला गाणं आषाढीच्या मुहूर्तावर रिलीज
अल्ला विठ्ठला गाणं आषाढीच्या मुहूर्तावर रिलीज

By

Published : Jul 1, 2020, 6:37 PM IST

मुंबई - आषाढी एकादशीच्या दिवशी विठूरायाच्या चरणी आपली कला सादर करण्यासाठी अनेक कलाकार आसुसलेले असतात. त्यातुनच अनेक उत्तम रचना, अभंग आणि वेगळा विचार मांडणारी गीतं दरवर्षी आपल्या भेटीला येत असतात. यावर्षीही अल्ला विठ्ठला या गीताद्वारे असाच एक वेगळा विचार मांडणारं गाणं आपल्या भेटीला आलं आहे.

रमजानमधले रोजे आणि विठ्ठलाची एकादशी दरवर्षी साधारणत: एकाच महिन्यात येते. धर्म वगळला तर या दोघांची शिकवण मात्र सारखीच असल्याचे आपल्याला दिसतं. हिंदू धर्मात महिनाभर चालून विठुरायाचं दर्शन घेतलं जात तर, मुस्लिम धर्मात महिनाभर कडक उपवास करून अल्लाशी एकरुप होण्याची शिकवण दिली जाते. एवढंच काय तर वारीतही हिंदू आणि मुस्लिम दोन्ही संतांच्या पालख्या एकत्र निघून आषाढीच्या दिवशी पंढरपुरात एकत्र जाऊन विसावतात.

यंदा 'कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त लाखों वारकरी वारीसाठी जाऊ शकले नाहीत. परंतु, 'बोलावा विठ्ठलं, पहावा विठ्ठलं', या उक्तीप्रमाणे विठ्ठल विचारातून अनुभवता यावा, यासाठी धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन सर्वधर्म समभावाचा वारीचा संदेश पोहचवण्यासाठी ‘अल्ला विठ्ठला’ या आगळ्यावेगळ्या गाण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. गीतकार आनंद प्रभू यांनी हे गाणं लिहिलं असून गायक नंदेश उमप याने ते गायलं आहे. संगीतकार आशुतोष वाघमारे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून दिग्दर्शक आणि रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. या गीताच्या माध्यमातून कलाकारांनी विठ्ठल चरणी आपली श्रद्धा प्रकट केली आहे.

अल्ला विठ्ठला गाण्याची लिंक -https://www.youtube.com/watch?v=adFMAHlZ0n0&feature=youtu.be

ABOUT THE AUTHOR

...view details