महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Denied Bail Of Police Officer : खंडणी प्रकरणातील तिनही पोलिस अधिकार्‍यांचा जामीन फेटाळला - police officers were denied bail

मुंबई सत्र न्यायालय न्यायालयाने (Mumbai Sessions Court) खंडणी प्रकरणात (charged with extortion) गुन्हे दाखल असलेले, मुंबई एलटी मार्ग पोलीस स्टेशन (Mumbai LT Marg Police Station) च्या तिनही पोलिस अधिकार्‍यांचा जामीन फेटाळला आहे. पोलीस निरीक्षक ओम वनघाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जामठाडे या तीघां विरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल आहे. यात जामठाडे याचा अटकपूर्व जामीन फेटाळला असून तो फरार आहे, तर दोन पोलीस अधिकारी अटकेत आहेत.

Mumbai Sessions Court
मुंबई सत्र न्यायालय

By

Published : Mar 1, 2022, 2:03 PM IST

मुंबई:मुंबई एलटी मार्ग पोलीस स्टेशन मधे कार्यरत असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणीच्या आरोपाखाली गुन्हा (police officers charged with extortion) दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिकारी कर्तव्याच्या नावाखाली पैसे उकळत असल्याचे लक्षात येताच तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Police Commissioner Hemant Nagarale) यांनी चौकशी केली, आणि दोषी आधिकाऱ्यांवर वसुलीचा गुन्हा दाखल केला.

दिलीप सावंत यांनी याप्रकरणी चौकशी केली असता तीन पोलीस अधिकारी वसुलीसाठी सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते . त्यानंतर तिघांविरुद्ध एलटी मार्ग पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 384 आणि 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ओम वनघाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जामठाडे या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत हे तिन्ही अधिकारी लहान मोठ्या व्यापाऱ्यांकडून पैसे उकळायचे. या वसुलीमुळे काही व्यापाऱ्यांनी नाराज होऊन जानेवारी महिन्यात पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर त्यांनी अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभागीय आयुक्त दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते.

या प्रकरणातील पोलीस अपनिरीक्षक समाधान जामठाडे यांनी अटकपुर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता पण तो फेटाळण्यात आला जामठाडे अजूनही फरार आहेत. तर उर्वरीत पोलीस अधिकारी अटकेत आहेत त्यांनी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला मात्र मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details