मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने आज आयोध्या जन्मभूमी विवादीत जमीन प्रकरणाचा निकाल दिला आहे. यात विवादीत जमीन ही राम जन्मभूमीच असून बाबरी मशिदीकरिता वेगळी जागा देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वागत करण्यात येत असून जनतेने हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारला आहे. याप्रकरणी कोणीही राजकारण करण्याची आवश्यकता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी सन्मान करावा- नवाब मलिक
विवादीत जमीन ही राम जन्मभूमीच असून बाबरी मशिदीकरिता वेगळी जागा देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वागत करण्यात येत असून जनतेने हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारला आहे. याप्रकरणी कोणीही राजकारण करण्याची आवश्यकता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हा निकाल देशातील जनता स्वीकारायला तयार असून कोणत्याही समाजाने जय-पराजयाचा उत्साह साजरा करून वातावरण खराब करू नये. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाने याचे श्रेय घेण्याचे कार्य करू नये. जनतेने अगोदरच या निकालाची दक्षता घेतली असून यात मुस्लीम समाजामध्ये अगोदरपासूनच सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल त्याला सहकार्य करण्याची भावना होती. आणि त्यांनी हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारला असून यात कोणत्याही राजकीय पक्षाने भांडवल करून देशातील एकोपा बिघडविण्याचे कार्य करू नये. आणि मुंबईत जे १४४ कलम लागू करण्यात आले आहे. शहरात कोणताही तणाव निर्माण होणार नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांचे राजकारण आता या निकालामुळे संपले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा-'अयोध्या' प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त