महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 22, 2019, 3:59 PM IST

Updated : Nov 22, 2019, 6:08 PM IST

ETV Bharat / state

उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, ही सर्व शिवसेना आमदारांची इच्छा - अब्दुल सत्तार

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा पूर्ण झाली आहे. शुक्रवारी किंवा शनिवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित निर्णय घेऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.

अब्दुल सत्तार

मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी सेनेच्या सर्व आमदारांची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा पूर्ण झाली आहे. शुक्रवारी किंवा शनिवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित निर्णय घेऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, ही तर आमदारांची इच्छा

हेही वाचा - दोन दिवसात अंतिम निर्णय समजेल, उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय
शुक्रवारी मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या चर्चेविषयी आमदारांना सांगण्यात आले. शिवसेनेची पुढील भूमिका काय आहे, याबाबत देखील चर्चा करण्यात आली. सेनेच्या सर्व आमदारांना मुंबईतीस 'द ललित' या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

Last Updated : Nov 22, 2019, 6:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details