महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

All Party Meeting on Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीच्या निमंत्रणावरुन ठाकरे गटाचं आधी 'मानापमान' नंतर 'तळ्यात, मळ्यात', 'शेवटी सूर राहू दे' - उद्धव बाळासाहेब ठाकरे

All Party Meeting on Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीचं ठाकरे गटाला निमंत्रण नसल्याचं म्हणत खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. मात्र प्रत्यक्षात मात्र बैठकीला ठाकरे गटाचे आमदार उपस्थित राहिले आहेत.

All Party Meeting on Maratha Reservation
All Party Meeting on Maratha Reservation

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 1:16 PM IST

मुंबई All Party Meeting on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रचंड तापलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सरकारच्या वतीनं सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं. मात्र उद्धव ठाकरे यांना या बैठकीचं निमंत्रण दिलं, नाही म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांना बोलावण्यात आलं नाही, तरीही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं मनाचा मोठेपणा दाखवून मराठा आरक्षणासाठी कोणतंही राजकारण न करता आपल्या आमदारांना या बैठकीला पाठवल्याचं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलंय.

निमंत्रण आलं नसलं तरी ठाकरे गटाचे आमदार बैठकीला : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आजच्या सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नाही. उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य आहेत. मात्र सरकारनं आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शन घडवलं असून शरद पवार, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना माजी मुख्यमंत्री म्हणून या बैठकीला निमंत्रित करण्यात आलं. मात्र, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं नाही. तरीही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं मनाचा मोठेपणा दाखवून मराठा आरक्षणासाठी कोणतंही राजकारण न करता आपल्या आमदारांना या बैठकीला पाठवलं आहेत, अशी प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माध्यमप्रमुख हर्षल प्रधान यांनी दिलीय.

संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल : मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "आरक्षणाबाबत प्रश्न सुटणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संकुचित मनोवृत्तीनं हा प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नात राजकारण केलं जाऊ नये. हा आमचा विषय आहे. ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्र पेटत असेल तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढायला हवा. सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे. मात्र, या बैठकीत ऐरे गैरे नथूलाल बोलावले आहेत. ज्यांचा एकही आमदार नाही. पक्षाचं अस्तित्व नाही. एखादा आमदार आहे. अशा सर्वांना आमंत्रित केलं आहे. मात्र 16 आमदार आणि सहा खासदार असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं नाही, ही त्यांची संकुचित मनोवृत्ती आहे. त्यांचा डरपोकपणा आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर टीकास्त्र सोडलं.

शिवसेनेचं कधी हो, कधी नाही : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नसल्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, अशी स्पष्टोक्ती पक्षाचे खासदार आणि प्रवक्ता संजय राऊत यांनी केली होती. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या निमंत्रणपत्रिकेतही शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून कुणाच्याही नावाचा समावेश दिसत नव्हता. अपवाद अंबादास दानवे यांच्या नावाचा. मात्र दानवे यांना शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेता या नात्याने राजशिष्टाचाराचा भाग म्हणून निमंत्रित करण्यात आलं, असा युक्तीवाद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून करण्यात आला. त्यातच आमचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असं ठामपणे सांगणाऱ्या संजय राऊत यांचं वक्तव्य हवेत विरण्यापूर्वीच सदर बैठकीला अनिल परब आणि सुनील प्रभू हे शिवसेनेचे अनुक्रमे विधान परिषद आणि विधानसभा आमदार उपस्थित राहिले. त्यामुळे शिवसेनेची नेमकी अधिकृत भूमिका कोणती? पक्षात समन्वय आहे की नाही? हे प्रश्न नव्यानं चर्चेला यायला लागले तर आश्चर्य वाटायला नको.

हेही वाचा :

  1. MLA Strike at Mantralaya : मराठा आरक्षणासाठी आमदारांचे आंदोलन, मंत्रालयाच्या गेटला ठोकलं टाळं
  2. Maratha Reservation Protest : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात मध्यरात्री खलबत; सर्वपक्षीय बैठकीचं ठाकरे गटाला निमंत्रण नाही?
  3. Maratha Reservation Live update : आमदार निवासाबाहेरील गाड्यांची तोडफोड, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details