मुंबई -काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन श्रद्धांजली सभा आयोजित केली गेली होती. या शोकसभेत देशातील सर्वपक्षीय खासदार आणि नेत्यांनी राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.
हेही वाचा -पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रसह, घाट भागात पावसाची शक्यता
नेते, खासदार यांच्या प्रतिक्रिया
- कोणत्याही आपत्तीत कसे काम करायचे हे खरे तर मला राजीव सातव यांच्याकडून शिकायला मिळाले असे, एआयवायसीचे अध्यक्ष बी.व्ही श्रीनिवास म्हणाले.
- राजीव सातव यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या पक्षात नसलो तरी सातव हे नेहमीच माझी विचारपूस करत असत. ते एक सुसंकृत व्यक्तिमत्व होते, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- कमी वयात शिखर गाठल्यानंतर देखील राजीव सातव विनम्र राहिले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी दिली.
- कोविडनंतर मी राजीव सातव यांना भेटणार होतो, परंतु ती भेट आता कधीच होणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
- राजीव सातव हे एक उत्तम अभ्यासू, संसदपटू होते. त्यांचा अभ्यास, वक्तृत्व आणि अविर्भाव आम्हाला संसदेत बरेच काही शिकवून गेला, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
- राजीव सातव हे अतिशय अभ्यासू आणि तितकेच नम्र वृत्तीचे नेते होते, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
- महाविकास आघाडी कायम राहावी म्हणून सर्वात जास्त सजग असणारा नेता म्हणजे राजीव सातव, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
- नेहमी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा आमचा भाऊ आमच्यातून निघून गेला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
- राजीव सातव यांचे विचार, त्यांची स्मृती जिवंत ठेवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री सतेज पाटील यांनी दिली.
- देशाचे मोठे नुकसान, एक मोठे नेतृत्व हरपले, अशी प्रतिक्रिया मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
अगदी कमी वयातच त्यांनी जिल्हा पातळीपासून आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. त्यानंतर युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करत मोठी मजल मारली होती, पंरतु आज असे उमेदीच्या वयात त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही न भरून निघणारी आहे, अशी हळहळ काँगेसच्या प्रमुख नेत्यांकडून आणि सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -माणुसकीचं नातं कसं जपावं हे निलेश लंके यांनी दाखवले - जयंत पाटील