महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई, पुणे, नागपूरमध्ये आजपासून सक्तीची बंदी; रस्त्यांवर शुकशुकाट

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये सक्तीची बंदी लागू करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी या शहरांमध्ये करण्यात येत आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Mar 21, 2020, 9:52 AM IST

मुंबई - सक्तीची बंदी लागू केल्याने आज मुंबई, पुणे, नागपूरसह इतर ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत आहे. रेल्वेस्थानकांवर तुरळक गर्दी दिसत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये सक्तीची बंदी लागू करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी या शहरांमध्ये करण्यात येत आहे.

नागपूरमध्ये आज सकाळी पोलिसांनी शहरामध्ये फिरून लोकांना सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव केला. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी आवाहन करण्यात आले. मुंबईतील रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या २५८ वर गेली आहे. यामध्ये ३८ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा राज्यात सर्वात जास्त म्हणजे १४ परदेशी नागरिकांना आणि तेलंगणात ९ जणांना लागण झाली आहे. आज (शनिवारी) राजस्थान राज्यात ६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details