मुंबई - पीएमसी बँकेच्या संचालकाला कालच अटक झाली आहे. यामध्ये अजून काही अधिकाऱ्यांना लवकरच अटक होऊन त्यांच्यावर सुध्दा कारवाई होईल, असा विश्वास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. या घोटाळ्यामध्ये बँकेचे अजून काही अधिकारी सहभागी असून सर्वांनी संगनमताने खातेदारांना लुटले आहे. त्यांचेही तपास चालू आहेत आणि ते लवकरच जेल मध्ये जातील. याशिवाय एका बाजूला ऍक्शन प्लॅन सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगीतल्याप्रमाणे बँक पुनर्जीवित करण्याची चर्चा चालू आहे. गुंतवणूकदार आणि खातेदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.
पीएमसी बँकेच्या सर्व घोटाळेबाजांवर कारवाई होणार - किरीट सोमय्या - All fraudsters of PMC Bank will be jailed
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी काही संचालक मंडळावरील काही संचालकांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. परंतु यामुळे खातेधारक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले असून काहीचा तर मानसिक त्रासातून मृत्यू झालेला आहे.
हेही वाचा -हे तर मनुवादी सरकार..; शिवरांयांचा इतिहास वगळण्याच्या प्रकरणावरून आव्हाडांचा घणाघात
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी काही संचालक मंडळावरील काही संचालकांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. परंतु यामुळे खातेधारक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले असून काहीचा तर मानसिक त्रासातून मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ही मोठी चिंतेची बाब आहे. सर्व खातेदारांचा विचार करत सरकार आणि आरबीआय यावर योग्य विचार करत खातेधारकांना त्यांचे पैसे परत मिळवून देईपर्यंत प्रयत्न करत राहतील, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.