महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हनुमान जयंतीनिमित्त ओपन जिममध्ये राहुल शेवाळेंचा व्यायाम, दिला बलोपासनेचा संदेश - message

तरुण आणि फिट उमेदवार म्हणून परिचित असलेले असलेले राहुल शेवाळे आज सकाळी 8 च्या सुमारास शिवाजी पार्क येथील ओपन जिममध्ये पोहोचले. येथे त्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत हनुमान जयंती निमित्त पूजा केली आणि थेट व्यायामाला सुरुवात केली. पेक डेक, बॅक पुली या मशीनवर प्रत्येकी एक एक सेट मारून त्यांनी तरुणाईला फिटनेसचा संदेश दिला

हनुमान जयंतीनिमित्त ओपन जिममध्ये राहुल शेवाळेंचा व्यायाम, दिला बलोपासनेचा संदेश

By

Published : Apr 19, 2019, 2:45 PM IST

मुंबई -हनुमान जयंतीच्या निमित्ताने दक्षिण- मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी बलोपासनेचा संदेश अनोख्या पद्धतीने दिला. शिवाजी पार्क इथल्या ओपन जिममध्ये सकाळी स्वतः व्यायाम करून शेवाळे यांनी शारीरिक फिटनेसबाबत जनजागृती केली.

हनुमान जयंतीनिमित्त ओपन जिममध्ये राहुल शेवाळेंचा व्यायाम, दिला बलोपासनेचा संदेश

तरुण आणि फिट उमेदवार म्हणून परिचित असलेले असलेले राहुल शेवाळे आज सकाळी 8 च्या सुमारास शिवाजी पार्क येथील ओपन जिममध्ये पोहोचले. येथे त्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत हनुमान जयंती निमित्त पूजा केली आणि थेट व्यायामाला सुरुवात केली. पेक डेक, बॅक पुली या मशीनवर प्रत्येकी एक एक सेट मारून त्यांनी तरुणाईला फिटनेसचा संदेश दिला.

राहुल शेवाळे म्हणाले श्री हनुमान म्हणजे शक्तीचं प्रतीक! आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने बलोपासनेचा संदेश देण्यासाठी येथे आलो. देशात जर मजबूत आणि स्थिर सरकार आणायचे असेल, तर नेत्यांसोबतच जनतेनेही फिट राहायला हवे. सुदृढ शरीरामुळेच विचारही सुदृढ होतात.

शेवाळे यांचा विरोधकांना इशारा -

विरोधकांना काय इशारा द्याल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, "मी केवळ अनुभवाने फिट नसून, शरीराने आणि विचारांनीही फिट आहे", अशा शब्दांत राहुल शेवाळे यांनी विरोधकांना इशारा दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details