प्रतिक्रिया देताना अक्षय परांजपे मुंबई : जगात वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. अनेकांमध्ये काही ना काही कमतरता असते. मात्र, जे त्याच कमीपणाला आपली मजबुती बनवितात तेच यावर मात करून यशस्वी होतात. त्यांची दखलही समाजाला घ्यावीच लागते. असच एक नावं अक्षय परांजपे हे आहे. अक्षय परांजपे हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. अक्षय 'विल्सन डिसीज' नामक एका आजाराने ग्रस्त आहे. या अनुवांशिक आजारामुळे त्याचs शरीर थरथरत असते.
हा आनुवंशिक आजार :असे म्हणतात की, फोटोग्राफीसाठी आपले शरीर आणि मन स्थिर असावे लागते. आपल्या हालचालींवर आपल्या मनावर नियंत्रण असेल तर तुम्ही चांगले फोटोग्राफर बनू शकता. अर्थात तुम्हाला त्याची आवड आणि तसे व्हिजनही असणे आवश्यक आहे. मात्र अक्षय परांजपे गेले काही वर्ष पुण्यात फोटोग्राफी करत आहे. त्याला 'विल्सन' हा दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे. तरीही तो कोणतेही फोटो अगदी परफेक्ट क्लिक करतो, ते एडिट करतो. कारण फोटोग्राफी ही अक्षयची पॅशन आहे. विल्सन आजार झाल्याचे अक्षयला 2011 मध्ये कळले होते. 2010 च्या डिसेंबरपासून या आजाराची लक्षणे त्याला दिसायला लागली होती. त्याचे वय तेव्हा जेमतेम 16 वर्षं होते. त्याची वागणुक बदलली होती.
आई आणि बहिणीची साथ :हा आजार काय आहे? हे त्याच्या कुटुंबियांना सुरुवातीला कळलेच नाही. तो 10 वीपर्यंत छान होता, त्याला दहावीनंतर हा आजार झाला. या आजारासंदर्भात कोणालाही काहीही माहीत नव्हते. तो काहीतरी वेगळेच वागू लागला होता. जो मुलगा खूप बिनधास्त होता, अभ्यासू होता, जो उत्कृष्ट बॅडमिंटन खेळायचा तो अचानक शांत झाला होता. त्याचे हात-पाय अर्थात संपूर्ण शरीर हलायला लागले होते. या आजारामुळे अक्षय चार वर्ष संपूर्ण अंथरुणावर पडून होता. अश्या वेळी सर्वात जास्त त्याला त्याच्या आईने आणि बहिणीने सांभाळले, अशी माहिती अक्षयने दिली.
कोकणचा कलाकार :आज तो खूप उत्कृष्ट छायाचित्रकार झाला आहे. त्याला त्याच्या आजोबांनी कॅमेरा घेऊन दिला आणि त्याने त्याच स्वतःहून शिक्षण घेतले. रत्नागिरीचा असल्यामुळे अक्षयला निसर्गाची साथ लाभली. आणि त्याच्यातला कलाकार बाहेर आला. आज अक्षय अनेक हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचे वैयक्तिक छायाचित्र काढतो. अभिनेता सचिन पिळगावकर, अभिनेता विक्रम गोखले, अभिनेता मोहन जोशी, अभिनेता लोकेश गुप्ते, अभिनेत्री शिल्पा तुळसकर, कवी संदीप खरे अशा दिग्गज कलाकारांसोबत अक्षयने काम केले आहे.
हेही वाचा : Tiger Deaths In India : वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर, बिबट्यांच्या संख्येतही झपाट्याने घसरण