महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बनावट चलनी नोटा प्रकरण : एनआयएने केली राजू बटलाला अटक - राजू बटलाला अटक न्यूज

राष्ट्रीय तपास यंत्रणेने बनावट भारतीय चलनी नोटा प्रकरणात अकबर हुसेन उर्फ राजू बटला या आरोपीला अटक केलेली आहे. ही कारवाई मुंबईतील ट्रॉम्बे परिसरामध्ये करण्यात आली.

akbar batala arrested by NIA for fake indian currency case
बनावट चलनी नोटा प्रकरण : एनआयएने केली राजू बटलाला अटक

By

Published : Dec 10, 2020, 10:10 AM IST

मुंबई- राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मुंबईतील ट्रॉम्बे परिसरामध्ये कारवाई करत अकबर हुसेन उर्फ राजू बटला या आरोपीला बनावट भारतीय चलनी नोटांच्या संदर्भात अटक केलेली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँचने मुंबई विमानतळावरून दुबईवरून आलेल्या जावेद गुलाब नबी शेख या इसमास अटक करून त्याच्याकडून 23 लाख रुपयांच्या भारतीय बनावट चलनी नोटा हस्तगत केल्या होत्या. यानंतर एनआयएकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.

पाकिस्तानातून दुबई मार्गे आणल्या बनावट भारतीय चलनी नोटा
अटक करण्यात आलेला अभिलेखा वरील आरोपी अकबर हुसेन ऊर्फ राजू बटला याने जावेद गुलाब नबी शेख यास दुबई जाण्यासाठी त्याचे विमानाचे तिकीट, व्हिजा या सगळ्यांचा खर्च केला होता. दुबईवरून परतत असताना जावेद गुलाब नबी शेख यांने 23 लाख रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा घेऊन आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतल्यावर या बनावट नोटा आढळून आल्या. आरोपीच्या चौकशीमध्ये त्याने सदरचे बनावट चलनी नोटा या राजू बटला याने आणण्यास सांगितले होते. दुबईमधील सरदार नावाच्या व्यक्ती कडून या नोटा त्यास मिळाल्या असल्याचे त्याने सांगितलं होतं.

दाऊदशी आहे संबंध
या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात असताना अकबर हुसेन उर्फ राजू बटला यास अटक करण्यात आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अकबर हुसेनने लोकसभा निवडणूक लढवली होती. मुंबईतील ट्रॉम्बे परिसरामध्ये त्यास अटक करण्यात आलेली असून त्याच्या नावावर 30 हून अधिक गंभीर गुन्हे या अगोदर नोंदविण्यात आलेले आहेत. सदरच्या जप्त केलेल्या 23 लाख रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा या दाऊद इब्राहिमच्या संपर्कातील व्यक्तींनी आरोपींना दिले असल्याचा एनआयएला संशय आहे.

हेही वाचा -मुख्यमंत्री ठाकरे सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांच्या दौऱ्यावर; असा आहे दौरा

ABOUT THE AUTHOR

...view details