महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना संतापजनक, अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया - पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

ajit pawar
ajit pawar

By

Published : Sep 7, 2021, 6:39 PM IST

मुंबई - पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा -Urban Naxalism Case : रोना विल्सन यांना वडिलांच्या अंत्यविधीसाठी तात्पुरता जामीन मंजूर


गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षात घेता रेल्वे राज्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनाही अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात येईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा -डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : 15 सप्टेंबरला आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले जाणार

13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण करून तिच्यावर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. बलात्कार करणाऱ्यांमध्ये दोन रेल्वेचे कर्मचारी आणि रिक्षाचालक तसेच इतरांचाही समावेश आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत, आठ आरोपींना अटक केली आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details