महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवार निगेटिव्ह, थकवा असल्याने झाले क्वॉरन्टाइन - Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार होम क्वॉरन्टाइन झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. परंतु थकवा जाणवत असल्याने अजित पवार यांनी क्वॉरन्टाइन होण्याचा निर्णय घेतला.

Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार

By

Published : Oct 22, 2020, 2:11 PM IST

Updated : Oct 22, 2020, 2:35 PM IST

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार होम क्वॉरन्टाइन झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी मात्रनिगेटिव्ह आली आहे. परंतु थकवा जाणवत असल्याने अजित पवार यांनी होम क्वॉरन्टाइन होण्याचा निर्णय घेतला.

तसेच, त्यांनी आजच्या नियोजित बैठकाही रद्द केल्या आहेत. अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा होती. मात्र अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नाही, अशी माहिती त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दिली आहे.

अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासूनरंगल्या होत्या. मात्र त्यानी टेस्ट केली असता सुदैवाने त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आज राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात होणारा जनता दरबार रद्द करण्यात आला आहे.

व्हिसीद्वारे बैठकीला हजर राहणार

आज अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. अजित पवार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहणार आहेत.संध्याकाळी शरद पवार यांच्यासोबत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक होणार आहे, असे त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Last Updated : Oct 22, 2020, 2:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details