महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar news: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ, जाणून घ्या अपडेट - why Ajit Pawar upset

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पहाटे झालेला शपथविधी, विरोधी पक्ष नेते पद ही काही त्यांच्या नाराजीची कारणे समजली जात आहे. खरं तर मागील वर्षापासून राजकीय सत्तांतराचे महानाट्य सुरू आहे. मात्र, अचानक त्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Ajit Pawar
अजित पवार

By

Published : Jul 2, 2023, 2:34 PM IST

Updated : Jul 2, 2023, 2:49 PM IST

मुंबई :विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपध घेतली आहे. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाती शपथ घेतली आहे. महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. मात्र, या राजकीय घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मागील काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात काही नवीन नियुक्त्या केल्याची घोषणा केली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली होती. यावेळी त्यांनी इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली. परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे मात्र कोणतीच नवीन जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या नाराजीचे मोठे कारण समजले जात होते.

विरोधी पक्षनेते पदामध्ये इंटरेस्ट नव्हता : या वर्धापन दिनात अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेते पदामध्ये इंटरेस्ट नव्हता, मला संघटनेत कोणतेही पद द्या, त्या पदाला न्याय देईल, अशी मागणी केली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार पडलेल्या वर्धापन दिनी सोहळ्यात बोलत होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून पहाटे झालेला शपथ विधी यावरून त्यांच्यावर सारखी टीका केली जात होती. त्यामुळे देखील त्यांचा नाराजीचा सुर उमटला असावा.

पहाटेचा शपथविधी :2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा डाव होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. परंतु शरद पवारांमुळे ते सरकार अयशस्वी झाले, असे ते म्हणाले होते. यावरून फडणवीस व पवारांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. यावरून देखील अजित पवार नाराज असल्याचे समजते.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar on Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवारांची गुगली; पवार-फडणवीसांमध्ये वाकयुद्ध, पाहा कोण झाले बोल़्ड
  2. Maharashtra Politics: अजित पवारांचे प्रदेशाध्यक्ष पदासाठी दबाव तंत्र ? देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची दोन तासांपासून बैठक
  3. Supriya Sule News : अजितदादाच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच माझी इच्छा - सुप्रिया सुळे
Last Updated : Jul 2, 2023, 2:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details