महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar : सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड तणावाखाली-अजित पवार - Opposition Leader Ajit Pawar

विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar)यांची मुंबईत पत्रकार परिषद पार (Ajit Pawar press conference in Mumbai) पडली. त्यावेळी त्यांनी माध्यमांसोबत बोलत होते.

Ajit Pawar
अजित पवार

By

Published : Nov 15, 2022, 2:04 PM IST

मुंबई :विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar)यांची मुंबईत पत्रकार परिषद पार (Ajit Pawar press conference in Mumbai) पडली. त्यावेळी त्यांनी माध्यमांसोबत बोलत होते. सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड तणावाखाली काम करत आहे. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून फोन येतात. आमच्यावर दबाव असल्याचे ते बोलून दाखवतात. हे लोकशाहीला शोभणीय नाही. मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी प्रचंड तणावाखाली आहेत. सरकार आल्यापासून प्रशासनामध्ये म्हणावं तस काम होत नाही. आधी दोघेच काम करत होते. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर काही जण मंत्री झाले.

विनाशकाली विपरीत बुद्धी :शिर्डीत 4-5तारखेला अधिवेशन होते. त्या दरम्यान मी बाहेर होतो. मी माध्यमांच्या समोर आलो नाही तर अनेक बातम्या येत होत्या. सार्वजनिक आयुष्यात गोष्टी लपवून ठेवता येत नाहीत. सध्या गोवरची साथ आहे. त्यावर काम केले पाहिजे. कोविडमध्ये मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याशी संपर्कात होते. आपल्या सहकाऱ्यांचे चुकत असेल तर त्यांना समज देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या दोघांचे देखील काम आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील बोलणे गरजेचे आहे. काही लोक मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ आहेत. आरटीआय़ टाकला आहे. किती जणांना वाय दर्जाची सुरक्षा आहे. ताफ्यात 25-30 गाड्या आहेत. मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो, हा जनतेचा पैसे आहे. काही माजी नगरसेवकांना 2 पोलीस कशाला ? मी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना भेटून बोललो तुमच्या पक्षात वाचाळवीरांची संख्या वाढतेय, हे मी त्यांना सांगितलं. असे म्हणत मी सत्तार यांच्यावर निशाण साधला. दारू पितो का ? असे नाही बोलत. तुम्ही सामान्य नागरिक नाही. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात विनाशकाली विपरीत बुद्धी असच बोलायला हवे, असे म्हणत त्यांनी खोचक टोला (Ajit Pawar press conference ) लगावला.

संस्कृती जपा :राज्यात कारखानदारी येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काही वरीष्ठ लोक उद्योगपतींना इतर राज्यात जाण्यास सांगतातआम्ही काय चुकलो ? ते सांगा. तुमच्या नाकर्तेपणामुळे काही प्रकल्प बाहेर गेलेत, ते सुद्धा सांगा. बैठक कोणाच्याही घरी होऊ. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. आनंदाचा शिधा हा मनस्तपचा शिधा झाला. अजून तो मिळलेलाच नाही माहिती मागवली आहे. यात गैरव्यवहार झाल्याच्या संशयला जागा आहे, ओल्या दुष्काळाकडे तर लक्षच (Ajit Pawar in Mumbai) नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details