मुंबई- माझगाव येथील जीएसटी भवनाला आज दुपारी भीषण आग लागली होती. या आगीच्या घटनेची चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती आहे.
जीएसटी भवनाला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी होणार - उपमुख्यमंत्री - Mumbai Fire
मुंबईच्या माझगाव येथील जीएसटी भवनला भीषण आग लागली होती. अग्नीशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. त्यांनतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली.
अजित पवार, उपमुख्यमंत्री
आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार, स्थानिक आमदार यामिनी जाधव, पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी पवार यांनी आगीची चौकशी करणार असल्याचे सांगितले.
आगीमध्ये किती नुकसान झालं त्याची माहिती घेतली जाईल. मी अधिकाऱ्यांना विचारले, त्यांनी माहिती दिली की सर्व डेटा आपल्याकडे आहे. सर्व डाटा कॉम्प्युटराईज आहे आणि मला माहिती देण्यात आली आहे की, सर्व सुरक्षित आहे, असे पवार यांनी सांगितले.