- 3.14 PM - अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिल्याच्या बातमीला संजय राऊत यांनी दिला दुजोरा म्हणाले, उद्धव ठाकरे 5 वर्षे मुख्यमंत्री
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच ही बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासूनच सुरू होते. अखेर आज त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
शनिवारी (दि. 23 नोव्हेंबर) अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते.
आज सकाळी सदानंद सुळे यांनीही अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली होती. अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीत असल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यांना विधीमंडळ नेते म्हणूनही निवडण्यात आले होते. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे, असे शरद पवार यांनी वारंवार सांगितले. आजही अनेक नेत्यांनी त्यांची समजूत काढली. अखेर आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.